Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ओव्हल टेस्टमध्ये भारताने बॉलसोबत केली छेडछाड? व्हॅसलिनचा केला वापर? पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

India vs England Oval Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमधील शेवटच्या सामन्यात भारताने रोमांचक विजय मिळवला.  यात मोहम्मद सिराजने इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. मात्र भारताच्या गोलंदाजीवर एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने काही आरोप केले आहेत.  

ओव्हल टेस्टमध्ये भारताने बॉलसोबत केली छेडछाड? व्हॅसलिनचा केला वापर? पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

IND VS ENG Oval Test : भारताचा इंग्लंड दौरा नुकताच पार पडला. या इंग्लंड दौऱ्यातील ओव्हल मैदानावर झालेला शेवटचा टेस्ट सामना जिंकून भारताने सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यामुळे भारत - इंग्लंड (India VS England) टेस्ट सीरिज ही बरोबरीत सुटली. या सामन्यात विजयाचं पारडं हे इंग्लंडच्या बाजून झुकत असताना टीम इंडियाचा (Team India) मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) गेम चेंजर ठरला आणि त्याने 6 धावा शिल्लक असताना इंग्लंडची शेवटची विकेट घेतली. भारताचा हा रोमांचक विजय अनेक वर्ष टीम इंडियाच्या फॅन्सच्या लक्षात राहील असा होता. पण पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटरने भारतीय गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करून गंभीर आरोप लावला आहे. 

टीम इंडियाने बॉल सोबत केली छेडछाड?

इंग्लंड दौऱ्यावर शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा झालेला विजय पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शब्बीर अहमदला पटला नसल्याचं दिसतंय. या माजी वेगवान गोलंदाजाने ओव्हल मैदानावर भारताने केलेल्या जबरदस्त पुनरागमनावर प्रश्न उपस्थित केलाय. त्याने टीम इंडियाद्वारे वापरण्यात आलेल्या ड्यूक बॉलची लॅब टेस्टिंग करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शब्बीरने दावा केलाय की टीम इंडियाने बॉलशी छेडछाड केली आहे. 

पाकिस्तानचा गोलंदाज शब्बीर अहमदच्या डोळ्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांचा परफॉर्मन्स खुपत असल्याचं दिसतंय. त्याने आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत लिहिले की, 'मला वाटतंय की भारताने व्हॅसलिनचा वापर केलाय. 80 ओव्हरनंतर सुद्धा बॉल हव्या सारखा चमकतोय. अंपायरला या बॉलची तपासणी करायचा हवी, तपासणी करण्यासाठी हा बॉल लॅबमध्ये पाठवायला हवा'. 

हेही वाचा : भारताच्या कसोटी यशाचा सर्वात मोठा फटका रोहित आणि विराटला बसणार? 'ते' स्वप्न अपूर्णच राहणार?

 

शब्बीर अहमद कोण आहे? 

शब्बीर अहमद हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर असून त्याने 1999 ते 2007 पर्यंत पाकिस्तानसाठी 10 टेस्ट, 32 वनडे आणि एक टी20 सामना खेळला आहे.  शब्बीर अहमदच्या नावावर 43 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 84 विकेट आहेत. शब्बीर अहमदवर त्याच्या चुकीच्या गोलंदाजीच्या ऍक्शनमुळे एक वर्ष बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 2006 रोजी हटवण्यात आली. त्यानंतर शब्बीरने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध काही सामने खेळले. आयपीएलच्या फायनलमध्ये हॅट्रिक घेण्यासाठी आणि चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी त्याचं योगदान राहिलंय. 

fallbacks

मोहम्मद सिराजने लगावलं विकेटचं शतक : 

ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 396 धावांवर ऑल आउट झाली होती त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी केली पण विजयासाठी त्यांना 35 धावा तर भारताला 4 धावांची आवश्यकता असताना चौथा दिवस संपल्याची घोषणा झाली. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. त्यामुळे भारताने 6 धावांनी सामना जिंकला. यात मोहम्मद सिराजने तब्बल 5 विकेट घेतले. यासह त्याने टेस्ट क्रिकेटमधील त्याचे 100 विकेट सुद्धा घेतले.  मोहम्मद सिराजने या टेस्ट सीरिजमध्ये एकूण 23 विकेट घेतल्या. 

FAQ : 

1. ओव्हल टेस्ट सामन्यात भारताच्या विजयात कोणाचा मोलाचा वाटा होता?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा गेम चेंजर ठरला. त्याने इंग्लंडच्या शेवटच्या विकेटसह सामन्यात 6 धावा शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

2. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शब्बीर अहमदने कोणता आरोप केला आहे?

शब्बीर अहमदने भारताने ओव्हल टेस्ट सामन्यात ड्यूक बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्याने दावा केला की भारताने व्हॅसलिनचा वापर केला, कारण 80 षटकांनंतरही बॉल चमकत होता.

3. शब्बीर अहमदने बॉलबाबत काय मागणी केली आहे?

शब्बीरने अंपायरने बॉलची तपासणी करावी आणि त्याची लॅब टेस्टिंग करावी अशी मागणी केली आहे.

Read More