Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज आजपासून, 'विराट'सेना जुना हिशोब चुकता करणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज आजपासून, 'विराट'सेना जुना हिशोब चुकता करणार?

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली वनडे खेळवली जाणार आहे. या वनडे सीरिजमध्ये जुने हिशोब चुकते करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. याआधी फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती. यावेळी वनडे सीरिजच्या पहिल्या २ मॅच जिंकल्यानंतर भारताने उरलेल्या तिन्ही मॅच गमावल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सीरिज खिशात टाकली.

मागच्या वर्षी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या तुलनेत यंदाची टीम जास्त मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाच्या यंदाच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचं पुनरागमन झालं आहे. बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांचं एका वर्षासाठी निलंबन केल्यामुळे दोघांना मागच्या भारत दौऱ्यासाठी येता आलं नव्हतं.

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडला व्हाईट वॉश केलं. याआधी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाने मजल मारली होती. इंग्लंडविरुद्धची ऍशेस सीरिजही ऑस्ट्रेलियाने ड्रॉ केली होती. स्मिथ आणि वॉर्नर तसंच नव्याने टीममध्ये दाखल झालेला मार्नस लॅबुशेन हे खोऱ्याने रन काढत आहेत.

दुसरीकडे भारताची टीमही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतानेही वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली होती. वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्याविरुद्ध घरच्या मैदानात भारताने सीरिज जिंकल्या.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेट कीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलियन टीम

एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, एश्टन अगर, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जॉस हेजलवूड, मार्नस लॅबुशेन, केन रिचर्डसन, डीआर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, एडम झम्पा 

Read More