Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India vs England: 'त्या' जॅकेटमुळे एक नव्हे तर दोन कसोटी जिंकलो! भारताच्या विजयाचं SG कनेक्शन

India vs England: भारताने ओव्हलमधील पाचवा सामना जिंकत अँडरसन-तेंडुलकर मालिका अनिर्णित राखली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंडने 2-2 सामने जिंकत मालिका बरोबरीत सोडवली आहे.   

India vs England: 'त्या' जॅकेटमुळे एक नव्हे तर दोन कसोटी जिंकलो! भारताच्या विजयाचं SG कनेक्शन

India vs England: भारताने ओव्हलमधील पाचवा सामना जिंकत अँडरसन-तेंडुलकर मालिका अनिर्णित राखली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंडने 2-2 सामने जिंकत मालिका बरोबरीत सोडवली आहे. अखेरच्या दिवशी इंग्लंड संघाला विजयासाठी 35 तर भारताला 4 विकेट्सची गरज होती. भारतीय संघाने 6 धावांनी सामना जिंकत इतिहास रचवला. पाचव्या दिवसाचा सामना सुरु होण्याआधी सुनील गावसकर यांनी आपण लकी व्हाईट जॅकेट घालणार असल्याचं शुभमन गिलला सांगितलं होतं. गाबामध्येही सुनील गावसकर यांनी हे जॅकेट घातलं होतं. गावसकरांनी केलेल्या दाव्यानुसार, ओव्हलच्या मैदानातही हे जॅकेट भारतीय संघासाठी लकी ठरलं. 

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी चौथ्या दिवशी सुनील गावसकर यांनी कर्णधार शुभमन गिलची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शुभमन गिलला SG अक्षरं असणारं एक शर्ट भेट म्हणून दिलं होतं. योगायोगाने सुनील गावसकर आणि शुभमन गिल यांच्या नावात SG आहे. तसंच गावसकरांनी शुभमन गिलला आपण उद्या माझं लकी व्हाईट जॅकेट घालणार असल्याचं सांगत नक्की जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. हेच जॅकेट आपण गाबाच्या कसोटी सामन्यात घातल्याची आठवण त्यांनी सांगितली होती.

गाबामध्ये भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. भारताच्या विजयानंतर सुनील गावसकर यांचं जॅकेट खरंच भारतासाठी लकी ठरल्याचं दिसत आहे. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 396 धावांवर ऑल आऊट झाला होता. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. यापैकी बेन डकेटने 54, जो रूटने 105, हॅरी ब्रुकने 111 धावा केल्या. इंग्लंड विजयापासून केवळ 35 धावा दूर होती, तेवढ्यात स्टेडियम परिसरात ढग दाटून आले आणि अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अंपायरनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. 

ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. भारताने 6 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिका अनिर्णित राखली आहे. 

 

FAQ : 

पाचव्या टेस्ट सामन्यात कोण ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'? 

मोहम्मद सिराजला शेवटच्या टेस्ट सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. त्याने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतले. 

भारत - इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये कोण ठरलं 'प्लेअर ऑफ द सीरिज'?

भारताचा कर्णधार शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात एकूण 754 धावा केल्या.  

भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकले?

ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 16 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ तीन सामने टीम इंडियाने जिंकलेत.

Read More