Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India vs England Test: 'जर मी कर्णधार असतो, तर आधी ऋषभ पंतला...', सचिन तेंडुलकर स्पष्टच बोलला, 'संघाच्या हितासाठी...'

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतला सल्ला दिला आहे. 

India vs England Test: 'जर मी कर्णधार असतो, तर आधी ऋषभ पंतला...', सचिन तेंडुलकर स्पष्टच बोलला, 'संघाच्या हितासाठी...'

भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यासह नव्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप पात्रता फेरीही सुरु होईल. भारतीय संघासाठी ही मालिका फक्त WTC सायकलच्या दृष्टीनेच महत्त्वाची नाही, तर ती भारतीय संघातील नव्या बदलचं युग असल्यानेही महत्त्वाची आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तरुणांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आली आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून, ऋषभ पंत उपकर्णधार आहे. 

ऋषभ पंत सघात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. मात्र त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असल्याने तो कशाप्रकारे परिस्थिती हाताळतो आणि दृष्टीकोन याकडे विशेष लक्ष असणार आहे. यष्टीरक्षख फलंदाज असणारा ऋषभ पंत निर्भयपणे फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र मागील काही काळापासून त्याने आता परिपक्वतेने खेळावं असा सल्ला दिला जात आहे. खासकरन ऑस्ट्रेलियाविरोधातील 2024-25 दौऱ्यानंतर पंतला टीकेचा सामना करावा लागला होता. 

ऋषभ पंत अत्यंत सहजपणे विकेट देत असल्याने त्याला चाहते आणि माजी खेळाडूंच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी दबावात असताना त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आता पंतने विकसित होण्याची गरज यावर भर दिला आहेय तेंडुलकरने पंतला त्याच्या विचारांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित केलं असले तरी, जर त्याला कसोटीत आपली क्षमता दाखवायची असेल तर त्याने अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी यावरही भर दिला.

"त्याने आपलं मन काय सांगतं यालाचा जास्त पाठिंबा दिला पाहिजे," असं तेंडुलकर म्हणाला. पुढे त्याने सांगितलं की, "पण काही क्षण असे असतील जेव्हा त्याला संघाच्या हिताच्या दृष्टीने खेळी करावी लागेल".

"मला माहिती आहे की, तो इतर वेळेही जे काही करतो ते संघाच्या हिताचंच असेल. पण त्याला आता त्याला दृष्टीकोन वेगळा असावा लागू शकतो. त्याच्या डोक्यात तितकी लवचिकता असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सामना वाचवायचा असेल तर त्याला तो बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. म्हणजे समजा 1 तास किंवा 45 मिनिटं किंवा कधीकधी दोन तास, जिथे त्याला ते धोकादायक शॉट्स खेळणं टाळावं लागले आणि खेळातून खेळी टाकावी लागेल. त्याला सकारात्मक राहावं लागलं, परंतु शॉट निवड महत्त्वाची ठरेल," असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.

सचिन तेंडुलकरने यावेळी जर मी कर्णधार असतो, तर ऋषभ पंतला कशाप्रकारे हाताळलं असतं याबद्दलही सांगितलं. मी त्याला त्याची आक्रमक खेळी करण्यासाठी मुभा दिली असती, मात्र जर भारताला सामना वाचवायचा असेल तर मात्र जबाबदारीने खेळ असं सांगितलं असतं. 

"जर मी कर्णधार असेन तर दहापैकी नऊ वेळा मी म्हणेन, 'बाहेर जाऊन तुमचा खेळ खेळा, कशाला काळजी करायची?' जर तुम्ही खेळ वाचवण्याचा विचार करत असाल, तर तेव्हाच दृष्टिकोन थोडा बदलतो, परंतु अन्यथा मी त्याला सांगेन की तुम्ही बाहेर जा आणि तुम्हावा हवं तसं खेळा आणि संघाच्या हितासाठी जे तुम्हाला वाटते ते करा," असं तेंडुलकर म्हणाला.

 

Read More