Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India Test Squad: गिल भारताचा कॅप्टन, तर उपकर्णधार...; इंग्लंड दौऱ्यासाठी 18 जणांच्या टीमची घोषणा

India vs England Test Series 2025 Indian Squad: भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ही घोषणा केली आहे.

India Test Squad: गिल भारताचा कॅप्टन, तर उपकर्णधार...; इंग्लंड दौऱ्यासाठी 18 जणांच्या टीमची घोषणा

England Test Series 2025 Indian Squad: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल यासंदर्भातील गूढ संपलं. आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शुभमन गिलची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ही घोषणा केली आहे. एकूण 18 जणांचा संघ निवडण्यात आला आहे. 

रोहितचा वारसा पुढे चालवणार

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका आठवड्याच्या कालावधीमध्ये कोसटीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार कोण होणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच या स्पर्धेसाठी कोणाची कर्णधार म्हणून निवड होणार याकडे भारताबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आज अजित आगरकर यांनी संघाची घोषणा करताना शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतल्याचं सांगितलं.

अनेक नावं होती चर्चेत पण...

संभाव्य कर्णधार म्हणून शुभमनचं नाव आघाडीवर होतं. मात्र ऋषभ पंत आणि अनुभव जसप्रीत बुमराह यांनाही कर्णधार बनवलं जाईल अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र निवड समितीने शुभमनवर विश्वास दाखवत त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

या दोघांना संधी

विशेष म्हणजे संघात करुण नायरचं पुनरागमन झालं असून आयपीएल गाजवणाऱ्या साई सुदर्शनलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. गोलंदाजीची मुख्य धुरा बुमराहकडे असेल. बुमराहबरोबरच वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अकाश दीप, अर्शदीप सिंग या गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

असा आहे भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार)
ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक)
यशस्वी जयसवाल
के. एल. राहुल
साई सुदर्शन
अभिमन्यू अस्वर्णा
करुण नायर
नितीश कुमार रेड्डी
ध्रुव जुरैल (यष्टीरक्षक)
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद्ध कृष्णा
अकाश दीप
अर्शदीप सिंग
कुलदीप यादव

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे. 

Read More