Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

सिडनी :  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

किती वाजता रंगणार सामना

भारतीय पुरुष हॉकी टीमचा हा कॉमनवेल्थ गेम्स 2018 मधला पहिला सामना आहे. भारत आणि पाकिस्तान बी गटात आहेत. बी गटातला हा सामना ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता रंगणार आहे.

कोठे पाहू शकता सामना

गोल्ड कोस्टच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. सोनी सिक्स आणि सोनी टेन-2 वर सामना तुम्ही लाईव्ह पाहू शकता. ऑनलाईन सामना पाहाण्यासाठी Sony.LIV वर तुम्ही पाहू शकता.

Read More