Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ब्लाईंड वर्ल्डकप: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार फायनल

भारताने एकतर्फी सामन्यामध्ये बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.

ब्लाईंड वर्ल्डकप: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार फायनल

दुबई : भारताने एकतर्फी सामन्यामध्ये बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.

बांगलादेशचा ७ विकेटने पराभव 

दुबईच्या एमसीसी ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या ब्लाईंड वर्ल्डच्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा ७ विकेटने पराभव केला. २० जानेवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शारजाहमध्ये रंगणार आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३८.५ षटकात सर्व विकेट्स गमावून २५६ धावा केल्या.

फायनलमध्ये धडक

या वेळी भारताकडून दुर्गा राव याने ३ विकेट्स घेतल्या आणि फक्त २० धावा दिल्या. शिवाय, दीपक मलिक आणि प्रकाश यांनीही दोन-दोन विकेट घेतल्या. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सुरुवातीलाच त्यांना विकेट गमावले. पण अब्दुल मलिकच्या नाबाद १०८ रनच्या खेळीमुळे बांग्लादेशला चांगल्या धावा करत्या आल्या.

मुहदकरचं शानदार शतक

भारतीय संघाला मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या गणेशभाई मुहदकर याच्या शतकामुळे विजय मिळाला. केवळ ६९ बॉलमध्ये त्याने ११२ रन केले. भारतीय संघासाठी मुहडकर व्यतिरिक्त, दीपक मलिकने ५३ धावांचे योगदान दिले आणि नरेशने ४३ धावांचे योगदान दिले. या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपच्या प्रबळ दावेदार आहे.

Read More