Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार

 सेंच्युरीयन : सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.

पहिला सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. त्यामुळे मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाला दुखापतीने ग्रासलंय. आधीच एबी डिविलियर्स दुखापतीमुळे पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यातून बाहेर गेला असताना दक्षिण आफ्रिकेला आणखी एक मोठा धक्का बसलाय.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु-प्लेसिस दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिकेतून बाहेर गेलाय. त्याच्याऐवजी संघाची धुरा एडेन मार्करमवर सोपवण्यात आलीय. 

Read More