विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली. दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा १४९ बॉलमध्ये १२७ रनची खेळी केली. पण या खेळीदरम्यानचा रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुजारासोबत खेळत असताना रोहितने त्याला शिवी दिली. स्टम्प मायक्रोफोनमध्ये रोहित शर्माचा आवाज कैद झाला.
२६व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ६२/१ असा होता. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बॅटिंग करत होते. पिडिटने टाकलेला बॉल रोहित शर्माने ऑफ साईडला मारला. यानंतर रोहित शर्मा रन काढण्यासाठी सरसावला, पण पुजाराने रन घ्यायला नकार दिला, तेव्हा रोहितने पुजाराबद्दल अपशब्द काढले.
@ImRo45 got no chill lol
— Stanley Abie (@stan_the_man_25) October 5, 2019
Poor @cheteshwar1 #INDvsSA pic.twitter.com/NYwbMZ4nD6
रोहित शर्मा आणि पुजारा यांच्यामध्ये १६९ रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा शतक करुन तर पुजारा ८१ रन करुन आऊट झाला. एकाच टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतकं करण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करताना दोन शतकं करणारा रोहित हा जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. तर मॅचमध्ये २ शतकं करणारा रोहित गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ओपनर आहे. विजय हजारे, सुनिल गावसकर (३वेळा), राहुल द्रविड (३ वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनीही एका टेस्टमध्ये २ शतकं केली आहेत.