Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs SL 1st ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस, टीम इंडियाला करावी लागणार बॉलिंग

श्रीलंका टीमचा कर्णधार कुसल परेराला याला सरावा दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे सीरिज तो बाहेर राहणार आहे. 

Ind vs SL 1st ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस, टीम इंडियाला करावी लागणार बॉलिंग

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका आजपासून वन डे सीरिज सुरू होत आहे. या सीरिजवरही पावसाचं सावट आहे. श्रीलंका संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला फील्डिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनला ही सीरिज जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. 

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मनीष पांडेय, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी.

श्रीलंकेचे फलंदाज कोच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे 13 जुलै ऐवजी ही सीरिज आजपासून खेळवली जात आहे. या सीरिजकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वनडे सीरिजआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. 

श्रीलंका टीमचा कर्णधार कुसल परेराला याला सरावा दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे सीरिज तो बाहेर राहणार आहे. परेराच्या अनुपस्थितीमध्ये श्रीलंकेच्या निवड समितीने अष्टपैलू खेळाडू दासून शनाकाला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्यामुळे या मालिकेत दासून श्रीलंका संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. 

दासुन शनाका (कर्णधार) धनंजय डी सिल्वा,  अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पाथुम निसानका, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, आशेन बांदारा, मिनोद भानुका,लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथ चमेरा, लक्षन संडकन, अकिला धनंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लक्षन, ईशान जयरात्नेप्रवीण जयविक्रेमा, असिता फर्नांडो, कसुन राजीता, लाहिरू कुमारा आणि ईसूरु उदाना. 

Read More