Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India Tour Sri Lanka | टीम इंडियाचा 10 वा खेळाडू टी 20 मालिकेतून बाहेर, भारताच्या अडचणीत वाढ

टी 20 सीरिजच्या तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का

India Tour Sri Lanka | टीम इंडियाचा 10 वा खेळाडू टी 20 मालिकेतून बाहेर, भारताच्या अडचणीत वाढ

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20 सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्याआधी धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा 10 वा खेळाडू टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेवटच्या सामन्याआधी आलेल्या या संकटातून आता टीम इंडियाला सावरत हा सामना जिंकणं गरजेचं आहे. 

श्रीलंके विरुद्ध वन डे सीरिज जिंकल्यानंतर आता सर्वांचं टी 20 सीरिजकडे लक्ष आहे. टी 20 सीरिजमध्ये भारत आणि श्रीलंका संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियाला सीरिज आपल्या नावावर करण्यासाठी जिंकणं गरजेचं आहे. 

टीम इंडियामध्ये कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कृणालच्या संपर्कात एकूण 9 भारतीय खेळाडू आले होते. त्यामुळे त्यांना टी 20 मालिकेतून बाहेर काढण्यात आलं होतं. इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, "पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ईशान किशन, देवदत्त पडीक्कल, आणि कृष्णप्पा गौतम टी 20 मालिकेतून बाहेर झाले आहेत". 

खेळताना वेगवान गोलंदाज  नवदीप सैनीला दुखापत झाल्यानं आजच्या सामन्यात तो खेळेल याची शक्यता फार कमीच आहे. तो या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला प्लेइंग इलेव्हन संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

श्रीलंका विरुद्ध टी 20 सीरिजच्या निमित्तानं देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नीतीश राणा आणि चेतन साकरिया या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. अर्शदीपने पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे टी 20 सीरिजच्या शेवटच्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते.

Read More