Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

live : भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

live : भारताचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत मालिका विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. 

सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा

टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास त्यांचा हा सलग पाचवा विजय असेल. श्रीलंकेने हा सामना जिंकल्यास त्यांचा भारतातील पहिला विजय असेल. 

फलंदाजांची कामगिरी पाहता भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. मोहाली येथील सामन्यात भारताच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली होती. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने दमदार द्विशतक ठोकले होते. 

Read More