Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy वर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांकडून टीम इंडियाचं कौतुक, म्हणाले की, ‘आम्हाला अभिमान…’

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर भारतात दिवाळी साजरी होत आहे. तशातच पंतप्रधान मोदींसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचं कौतुक केलंय. 

Champions Trophy वर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांकडून टीम इंडियाचं कौतुक, म्हणाले की, ‘आम्हाला अभिमान…’

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. असा इतिहास रचणारा भारतीय एकमेव संघ आहे. न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली. कॅप्टन रोहितने शर्माचा चांगल्या खेळीमुळे आज भारतात सर्वत्र दिवाळीसारखा जल्लोष आहे. भारताच्या या विजयानंतर राजकीय नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनीही ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलंय. 

पंतप्रधान मोदी म्हणालेत...!

एक अपवादात्मक खेळ आणि एक अपवादात्मक निकाल!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल आमच्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ केला आहे. आमच्या संघाचे सर्वांगीण कामगिरीबद्दल अभिनंदन.

अभिनंदन टीम इंडिया..!!

'शरद पवार म्हणाले, अविश्वसनीय...'

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये किती शानदार विजय! न्यूझीलंडविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्याने भारत विजयी झाल्याने आपल्या सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे, देशभरातील लाखो हृदये अभिमानाने भरली आहेत. भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा त्यांचा अजेय उत्साह, जोश आणि कौशल्य दाखवून जगाला सिद्ध केले आहे की ते खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. इतक्या मोठ्या व्यासपीठावर त्यांच्या अपवादात्मक कामगिरीने प्रत्येक भारतीयाला अविश्वसनीय अभिमान वाटला आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासात आणखी एक अविस्मरणीय अध्याय दिल्याबद्दल टीम इंडिया, धन्यवाद..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं टीम इंडियाचं कौतुक

इतिहास घडला, स्वप्ने पूर्ण झाली! चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते! 

किती रोमांचक सामना!  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडवर मेन इन ब्लूचा ऐतिहासिक विजय! तीनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ म्हणून मेन इन ब्लू उंच उभा आहे—२००२,

धडाकेबाज सुरुवात, दिमाखदार शेवट, शानदार खेळी! - अजित पवार 

धडाकेबाज सुरुवात, दिमाखदार शेवट, शानदार खेळी! अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय संघानं आपल्या विजयाची मोहोर उमटवली..! आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये झालेल्या अंतिम सामान्यात भारतीय संघानं आपलं वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला. या दिमाखदार विजयासाठी मी भारतीय संघातील तमाम खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. तसंच प्रशिक्षकांचं देखील अभिनंदन करतो. आज संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत आहे. देशवासियांना आपल्या खेळाडूंचा सार्थ अभिमान आहे.

Read More