IND vs ENG 4th T20I: भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. भारतीय संघाने हा सामना 15 धावांनी जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. आता या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. चौथ्या सामन्यात हर्षित राणा आणि रवी बिष्णोई यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. दोघांनीही प्रत्येक तीन विकेट्स घेतले.
टॉस हारल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. भारतीय संघाने इंग्लंडसमोर नऊ विकेट्स गमावत 181 धावांचं आव्हान उभं केलं होतं. भारतीय संघाची सुरुवात फार चांगली झाली नव्ही. फक्त दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावांवर भारताने तीन विकेट्स गमावले होते. जलदगती गोलंदाज साबिक महमूदने या ओव्हरमध्ये संजू सॅमसनला (2) बाद केलं. यानंतर त्याने तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना खातंही उघडू न देता तंबूत धाडलं.
यानंतर अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी 45 धांवाची भागीदारी झाली. पण दोघे मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. भारतीय संघाची अवस्था 79 धावांवर 5 विकेट होती. यानंतर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी मिळून 87 धावांची भागीदारी केली.
TeamIndia held their composure & sealed run victory in the 4th T20I to bag the series, with a game to spare!
— BCCI (@BCCI) January 31, 2025
Scorecard https://t.co/pUkyQwxOA3 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Jjz5Cem2US
हार्दिक पांड्याने 30 चेंडूंवर 53 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि चार षटकरांचा समावेश होता. हार्दिक बाद झाल्यानंतर शिवम दुबेनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. शिवमने 34 चेंडूंवर 53 धावा केल्या.
181 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने स्फोटक सुरुवात केली. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी मिळून पॉवरप्लेमध्ये 60 धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर रवी बिष्णोईने डकेटला बाद करत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. डकेतने फक्त 19 चेंडूक 39 धावा केल्या. यानंतर अक्षर पटेलने फिल सॉल्टला (23) बाद केलं. कर्णधार जोस बटलरला (2) बिष्णोईने आऊट केलं.
यानंतर कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून खेळणाऱ्या हर्षित राणाने लियामला बाद करत चौथं यश मिळवून दिलं. हॅरी ब्रूकने मैदानावर टिकून राहत अर्धशतक ठोकलं. वरुण चक्रवर्तीने एकाच ओव्हरमध्ये हॅरी ब्रूक आणि ब्रायडन कार्स यांना बाद केलं आणि इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकललं. इंग्लंड संघ संपूर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही. 19.4 ओव्हरमध्ये 166 धावांवर सगळा संघ बाद झाला आणि भारताने सामना जिंकला.