Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताची बॅटिंग गडगडली, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १२७ रनची गरज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे.

भारताची बॅटिंग गडगडली, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १२७ रनची गरज

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताची बॅटिंग गडगडली आहे. टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं भारताला २० ओव्हरमध्ये १२६/७ या स्कोअरवर रोखलं. पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलनं ३६ बॉलमध्ये ५० रन करून आपण पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवलं. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ओपनिंगला आले होते, पण रोहितला या मॅचमध्ये मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा फक्त ५ रन करून आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या विराट कोहलीनं राहुलबरोबर भारताचा डाव सावरण्याला सुरुवात केली. पण विराट कोहलीही १७ बॉलमध्ये २४ रन करून माघारी परतला. विराटची विकेट गेल्यानंतर भारतानं सातत्यानं विकेट गमावल्या. एमएस धोनीनं ३७ बॉलमध्ये २९ रनची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलनं ४ ओव्हरमध्ये २६ रन देऊन सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जेसन बेहरनडॉर्फ, ऍडम झम्पा आणि पॅट कमिन्स याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

Read More