Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!

Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

वर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!

Rahul Dravid On West Indies series loss: भारतीय संघाने गेल्या 20 वर्षांत दुसऱ्यांदा वेस्ट इंडिजविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका गमावली. त्यामुळे आता टीम इंडियाची नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव स्विकारा लागलाय. तर मग आता वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे. चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023)  चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे  (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

राहुल द्रविड म्हणाला काय? 

भारतातील 2023 विश्वचषकाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आमचा एकदिवसीय संघ आमच्या येथं असलेल्या या संघापेक्षा खरोखर वेगळा आहे. परंतु पुढं जाऊन आम्हाला काही क्षेत्रात काम करावी लागतील, असं राहुल द्रविड म्हणाले आहेत. काहीवेळा प्रत्येक सामन्याच विजयाचं अनुसरण करणं कठीण असतं. कसोटी सामने आणि एकदिवसीय मालिकेमुळे आम्ही आनंदी आहोत. टी-ट्वेंटीमध्ये, आम्ही 0-2 ने पिछाडीवरून परतलो आणि चांगली कामगिरी केली, पण मालिकेत बरोबरी साधता आली नाही, अशी खंत देखील राहुल द्रविडने बोलून दाखवली.

पहिल्या दोन सामन्यात आणि पाचव्या टी-20 सामन्यामध्ये आम्ही काही चुका केल्या. आम्ही क्षमतेप्रमाणे फलंदाजी केली नाही. पण हा एक तरुण आणि विकसनशील संघ आहे. आम्हाला या मालिकेत तरुणांना आजमावायचे होते आणि त्यांना संधी द्यायची होती, असं म्हणत राहुल द्रविड यांनी गेम प्लॅन सांगितला. मला वाटतं की आम्हाला डेथ ओव्हरमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांवर काम करण्याची गरज आहे. फलंदाजीवर काम करताना आम्हाला गोलंदाजांची धार देखील कमी होऊ देयची नाही, असंही कोच राहुल द्रविड म्हणतात. आमच्यासमोर काही आघाड्यांवर आव्हानं आहेत आणि त्यावर काम करण्याची गरज आहे.

आणखी वाचा - IND vs WI: रॉस्टर निघाला चित्त्यापेक्षा सुपरफास्ट, असा अद्भुत कॅच तुम्हीही पाहिला नसेल; पाहा Video

दरम्यान, टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडने युवा खेळाडूंचं कौतूक केलं आहे. तिलक वर्माने संपूर्ण सिरीजमध्ये मला प्रभावित केलं आहे. त्याने संघासाठी महत्त्वाचा रोल निभावला. तो डावखुरा फलंदाज असल्याने मिडल ऑर्डरमध्ये त्याचा प्रभाव दिसून आलाय, असं राहुल द्रविड म्हणतो. त्याचबरोबर द्रविडने मुकेश कुमारचं देखील कौतुक केलं आहे. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेत या दोन खेळाडूंना संधी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

Read More