Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताच्या 'या' दिग्गज गोलंदाजाला मिळाली होती बोटं कापण्याची धमकी, देशासाठी घेतल्या आहेत 765 विकेट्स

Indian Bowler: भारताचा दिग्गज फिरकीपटूला वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मोठी धमकी मिळाली होती. ज्याचा खुलासा आता त्याने आता केला आहे. या खेळाडूवर  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.   

 भारताच्या 'या' दिग्गज गोलंदाजाला मिळाली होती बोटं कापण्याची धमकी, देशासाठी घेतल्या आहेत 765 विकेट्स

Cricketer Got Threat: भारताचा दिग्गज फिरकीपटू आणि भारताला अनेक विकेट्स मिळवून देणारा फिरकीपटू म्हणजे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) . रविचंद्रन अश्विनला वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी बोट कापण्याची धमकी मिळाली होती. खुद्द रविचंद्रन अश्विनने एकदा क्रिकबझशी बोलताना हे गुपित उघड केले आहे. रविचंद्रन अश्विनने सांगितले की, लहानपणी टेनिस बॉल स्पर्धेच्या फायनलपूर्वी त्याला विरोधी संघाकडून धोका होता.  विरोधी संघातील काही मुलांनी त्याला धमकी दिली होती की जर तो फायनल खेळला तर त्याची बोट कापली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनच्या नावावर 765 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.  

घाबरून गेला होता रविचंद्रन अश्विन

अश्विन ही घटना सांगताना म्हणाला की, " माझा मित्र मला टेनिस बॉल टूर्नामेंट खेळायला सांगायचा. माझ्या वडिलांना हे अजिबात आवडायचे नाही. ते मला रस्त्यावरही खेळू द्यायचा नाही." त्याने पुढे सांगितले की, "तेव्हा मी 14-15 वर्षांचा होतो, काही मुलांचा एक ग्रुप माझ्याकडे आला. मी विचारले 'तुम्ही कोण?' तर मुलं म्हणाली 'तू फायनल मॅच खेळताय ना?' आम्ही तुला उचलायला आलो आहोत. ते मला त्याच्या बाईकवर चहाच्या दुकानात घेऊन गेला. त्याने मला तिथे बसवले आणि इडली-वड्याची ऑर्डर दिली. यानंतर अश्विनने मुलांना सांगितले की सामना सुरू होणार आहे, चला जाऊया. तेव्हा त्या मुलांनी मला सांगितले, नाही, नाही, आम्ही विरोधी संघातील आहोत आणि तुला फायनल खेळण्यापासून रोखायचे आहे. खेळलास तर तुझी बोटं आम्ही कापू. 

हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, 'या' दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का

 

मुलांनी अश्विनला घरी सोडले

यानंतर अश्विनने पुढे सांगितले की, " जेव्हा त्या मुलांनी मला घाबरवले तेव्हा मी त्यांना सांगितले की माझे वडील दुपारी 4 वाजता घरी येतात, त्यामुळे मला  कृपया करून घरी सोडा. मी त्याला अनेकवेळा विनवणी केली.  मी त्या सामन्यात खेळणार नसल्याचे वचनही दिले." अश्विनने सांगितले की, अनेक वेळा बोलल्यानंतर मुलांनी त्याला घरी सोडले. अश्विन घरी पोहोचताच त्याचे वडीलही घरी आले. जेव्हा वडिलांनी त्यांना विचारले की ही मुले कोण आहेत? तेव्हा मी आधी सांगितले की ते त्याचे मित्र आहेत पण नंतर सर्व सत्य त्याने सांगितले.

हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

 

आहे भारताचा महान गोलंदाज 

रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला अनेक सामने दमदार कामगिरीवर जिंकून दिले आहेत. रविचंद्रन अश्विनने 106 कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत आणि 3503 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 124 आहे.अश्विनने कसोटी सामन्यात 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने एका सामन्यात 8 वेळा 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. 

Read More