Rinku Singh-Priya Saroj Engagement: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुड्याचा सोहळा आज रविवारी ८ जून रोजी नुकताच पार पडला. या खास क्षणाच्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात रिंकू आणि प्रिया हातात हात घालून स्टेजकडे जाताना दिसत आहेत.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोजच्या या खास सोहळ्याला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. साखरपुड्याला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि पक्षाचे तब्बल २५ खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक VVIP पाहुणेही या समारंभाला उपस्थित होते. समोर आलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि प्रिया यांचे लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे.
1st appearance of Rinku singh and Priya Saroj...#rinkusingh #priyasaroj @samajwadiparty pic.twitter.com/BvLec6ncjg
— Anshu Singh (@Anshujourno92) June 8, 2025
रिंकू सिंहने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती तर तर प्रिया सरोज लाइट पिंक रंगाच्या लेहेंघ्यामध्ये सुंदर दिसत होती. तिने छान ओढणीही ड्रेप केली होती. या दोघांचा लूक खूपच सुंदर आणि मॉडर्न होता.
Cricketer Rinku Singh & SP MP Priya Saroj exchange rings today in a private ceremony#News #RinkuSingh #PriyaSaroj #Engagement #Samajwadi #SP #India pic.twitter.com/vHbqBMRGt1
— Bhaskar Chakravorty (@Bhaskar16603) June 8, 2025
साखरपुडा होण्याआधी रिंकू सिंह सकाळी ‘चोडेरे वाली मैया’चे या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्यांची बहीण नेहा सिंहने या दर्शनाचे फोटो तिच्या सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.
रिंकू सिंह यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे झाला. त्यांनी २०१८ मध्ये आयपीए (IPL) मध्ये डेब्यू केलं होता. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्यांनी एका सामन्यात शेवटच्या षटकात सलग ५ षटकार मारून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं.
आयपीएल 2025 (IPL 2025) साठी केकेआरने रिंकूला तब्बल १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होते. रिंकूने आतापर्यंत एकूण ५९ आयपीए (IPL) सामने खेळले असून, १४५.४७ च्या स्ट्राईक रेटने १०९९ धावा केल्या आहेत. त्याला एक दमदार फिनिशर म्हणून ओळखले जाते.
आंतरराष्ट्रीय करियरमध्ये त्याने २ वनडे आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्यांनी ५५ तर टी-२० मध्ये ५४६ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर टी-२० मध्ये ३ अर्धशतकं आहेत.