Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वयाच्या 39 व्या वर्षी शिखर धवन प्रेमासाठी आहे तयार? खेळाडूने मूव्ह ऑन प्लॅनचा केला खुलासा

Shikhar Dhawan: काही काळ गेल्यावर आता धवनने पुन्हा प्रेमात पडण्याबाबत आणि मूव्ह ऑन होण्याबाबत सांगितले आहे.    

वयाच्या 39 व्या वर्षी शिखर धवन प्रेमासाठी आहे तयार? खेळाडूने मूव्ह ऑन प्लॅनचा केला खुलासा

Shikhar Dhawan on Love: टीम इंडियाचा माजी फलंदाज शिखर धवन सोशल त्याच्या आयुष्याचे अपडेट्स नेहमीच सोशल मीडियावर देत सरो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या खेळाशिवाय मजेदार व्हिडीओंसाठी, फोटोसाठी ओळखला जातो. पण, या हॅपी गो लकी क्रिकेटरच्या  वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक नाही. धवन घटस्फोटित असून तो आपल्या मुलापासून वेगळा राहतो. काही काळ गेल्यावर आता धवनने पुन्हा प्रेमात पडण्याबाबत आणि मूव्ह ऑन होण्याबाबत सांगितले आहे. टाइम्स नाऊ समिट 2025 मध्ये शिखर धवनने केवळ क्रिकेटबद्दलच नाही तर वैयक्तिक आयुष्याविषयीही चर्चा केली नाही. अलीकडेच धवन आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत दिसला होता. त्याचे हे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. यामुळे धवन पुन्हा प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे.

"मी पुढे गेलो आहे..."

धवनच्या पूर्वीच्या नात्यातून मूव्ह ऑन होण्याबद्दल विचारले असता क्रिकेटरने त्यावर अखेर आपले मौन तोडले आहे. धवन म्हणाला, “होय, मी पुढे गेलो आहे. मी प्रेमात नशीबवान नाही असे म्हणणार नाही, पण माझ्या निवडी अननुभवी होत्या. पण आता माझ्याकडे अनुभव आहे, आणि त्याचा उपयोग होईल. माझ्यासाठी तो शिकण्याचा काळ होता. चांगले क्षण होते, वाईट क्षण होते आणि मी त्या सर्वांसाठी कृतज्ञ आहे."

हे ही वाचा: विजेच्या वेगाने स्टंपिंग! 0.10 सेकंदांपेक्षा कमी वेळात फिल सॉल्टला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; बघा Viral Video

 

"मी नेहमी प्रेमात असतो..."

शिखर धवनला विचारण्यात आले की, तो पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे का? यावर धवनने छान स्मितहास्य करत, "मी नेहमीच प्रेमात असतो." कोणाला भेटतोय का असे विचारले असता धवनने हा प्रश्न टाळला. तो म्हणाला, "क्रिकेटमध्ये बाउन्सर कसे टाळायचे हे मला माहीत आहे. मला माहीत आहे की तू आता माझ्यावर बाउन्सर फेकत आहेस. पण मी पकडला जाणार नाही."

हे ही वाचा: अनसोल्ड ते प्लेअर ऑफ द मॅच... कोणाच्या प्लॅनिंगमुळे शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये परतला? स्वतः खेळाडूनेच दिले उत्तर

शहाण्यांसाठी एक इशारा पुरेसा आहे... 

जेव्हा त्याला पंजाबी भाषेत विचारण्यात आले की  "चंगी कुड़ी है?" तेव्हा धवनने उत्तर दिले की, "शहाण्यांसाठी एक इशारा पुरेसा आहे." तो कोणाबद्दल बोलत आहे यवबद्दल जाणून घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र धवनने मौन बाळगले. तो गमतीने म्हणाला, "या खोलीतली सर्वात सुंदर मुलगी माझी मैत्रीण आहे. आता तूच सांग." जेव्हा त्याला मोठा प्रश्न विचारण्यात आला की, लग्नाचे काही नियोजन आहे का? त्यामुळे धवनने कोणतेही उत्तर दिले नाही. "जेव्हा वाटेल तेंव्हा करेन. काय घाई आहे?" अद्याप लग्नाची तारीख ठरलेली नसल्याची पुष्टी त्यांनी दिली.

Read More