Shivam Dube : मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अशी इच्छा अनेकांना असते. मुंबईतील गगनचुंबी इमारती आणि त्यातले आलिशान फ्लॅट अनेकांना आकर्षित करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भारतातील अनेक दिग्गज आणि नामवंत लोकांची घर आहेत. भारतातील अनेक क्रिकेटर्सनी देखील मुंबईत त्यांचं हक्काची घर विकत घेतलीयेत. आता भारताचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला शिवम दुबे (Shivam Dube) याचाही या यादीत समावेश झाला असून याने पत्नी सह मुंबईत 2 आलिशान घर खरेदी केलं आहे.
ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल Squareyards.com द्वारे नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची एकूण किंमत जवळपास 27.50 कोटी रुपये आहे. जून 2025 मध्ये याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून हे दोन्ही अपार्टमेंट डीएलएच एन्क्लेव्ह नावाच्या निवासी प्रकल्पात आहेत आणि शेजारील मजल्यांवर आहेत. या दोन्ही अपार्टमेंटचे एकूण कार्पेट क्षेत्र 4,200 चौरस फूट (390 चौरस मीटर) आहे आणि त्यांच्याकडे 3800 चौरस फूट 353 चौरस मीटर) चा टेरेस देखील आहे. दोन्ही अपार्टमेंटचे एकूण बिल्ट-अप क्षेत्रफळ 892.19 चौरस मीटर (9,603 चौरस फूट) आहे.
हेही वाचा : IND VS ENG : ऋषभ पंतला 'ही' चूक पडली महागात, लीड्स टेस्ट दरम्यान ICC ने सुनावली शिक्षा
शिवम दुबेने हे फ्लॅट्स देव लंड आणि हाउसिंग लिमिटेड (Dev Land and Housing Limited) कडून खरेदी करण्यात आले आहेत. यात तीन पार्किंगचा देखील समावेश आहे. या फ्लॅटच्या खरेदीवर एकूण 1.65 कोटींचं स्टॅम्प शुल्क आणि 30,000 रुपयांची नोंदणी शुल्क भरावं लागलं आहे. शिवम दुबेच हे घर अंधेरी भागात असून हे ठिकाण वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, लिंक रोड, एसवी रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाइन इत्यादींशी जोडलेलं आहे.
शिवम दुबेचा जन्म 25 जून 1993 रोजी झाला असून त्याने भारतीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पदार्पण केलं होतं. शिवम दुबे हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग आहे. शिवम दुबे हा भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता ज्यांनी 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.