Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी युवीचा महत्त्वाचा निर्णय

सर्वांच्याच लाडक्या युवराज सिंग याचा आज वाढदिवस. 

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी युवीचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि भेदक गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे क्रिकेटपटू युवराज सिंग. खेळाच्या मैदानातून प्रेक्षकांच्या मनोरंजनापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वांच्याच लाडक्या युवराज सिंग याचा आज वाढदिवस. 

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक महत्त्वपूर्ण आणि तितकाच प्रशंसनीय असा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. 

'आज मी आयुष्यात मिळालेल्या सर्वात मौल्यवान गोष्टीविषयीचा आनंद साजरा करत आहे. ती गोष्ट म्हणजे माझं आयुष्य. कॅन्सरशी लढा देण्यासाठी मला जी ताकद दिली त्यासाठी मी देवाचे आभार मानतो', असं म्हणत त्याने आपला निर्णय सर्वांना सांगितला. 

कॅन्सरशी यशस्वीपणे दोन हात केल्यानंतर आता युवराजने पुढे येत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आणि कॅन्सरने ग्रासलेल्या २५ लहान मुलांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यु वी कॅन  YouWeCan या त्याच्या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत गरजूंना मदत करण्यात येणार आहे. आपण ज्या वेदनेतून उभं राहण्यास शिकलो आहोत, त्याच वेदनेपासून प्रेरित होत अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या त्याच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. वाढदिवस साजरा करण्याचा त्याचा हा अनोखा अंदाजही सर्वांचीच मनं जिंकून  गेला. 

Read More