Indian Cricketers Birthday : भारतीय क्रिकेटसाठी 1 ऑगस्ट हा दिवस खूप खास राहिलाय. याच कारण म्हणजे याच दिवशी टीम इंडियाच्या दोन दिग्गज क्रिकेटर्सचा जन्म झाला होता. हे भारताचे दोन स्टार क्रिकेटर्स म्हणजे मोहम्मद निसार (Mohammad Nissar आणि अरुण लाल (Arun Lal). पण यातील एका स्टार क्रिकेटरला भारत सोडून पाकिस्तानला स्थायिक व्हावं लागलं होतं. मात्र याचं नेमकं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.
1 ऑगस्ट 1910 होशियारपुर मध्ये मोहम्मद निसारचा जन्म झाला तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. मोहम्मद निसार हे भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बॉल टाकणारा गोलंदाज आहे. मोहम्मद निसार यांना त्यांच्या करिअरमध्ये फक्त सहा टेस्ट सामने खेळण्याची संधी मिळाली असली तरी त्यांनी 25 टेस्ट विकेट घेतले. मोहम्मद निसारने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 11 पैकी तीन इनिंगमध्ये पाचपेक्षा जास्त विकेट किद्जल. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये 93 सामन्यात 396 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद निसार हा भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानला निघून गेला. त्यानंतर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांची पाकिस्तानचा पहिला संघ निवडला होता. पण नंतर राजकारणात गेल्याने तो क्रिकेट प्रशासन मधून बाहेर पडले. 1963 मध्ये हार्ट अटॅकमुळे या खेळाडूने जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा : आता विरोधकांची खैर नाही! भारतीय संघाने अचानक बदलला हेड कोच, 'या' स्टार खेळाडूचं नशीब चमकलं
1 ऑगस्ट 1955 मध्ये अरुण लाल यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला होता. त्याचे वडील, आजोबा आणि काकांच्या मुलाने देखील याचं खेळामध्ये नाव कमावलं. अरुण लालने भारतासाठी 16 टेस्ट क्रिकेट खेळले. यात त्याने 729 धावा केल्या. त्याने 13 वनडे आणि 122 धावा केल्या. अरुण लालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. त्याने 156 सामन्यात एकूण 10,421 धावा केल्या होत्या. त्याने यात 30 शतक आणि 43 अर्धशतक सुद्धा केली. 65 लिस्ट लिस्ट-ए सामन्यात त्याने 1,734 धावा केल्या. 2019 मध्ये त्याला क्रिकेट एसोसिएशन ऑफ बंगालकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा मिळाला.