Yashaswi Jaiswal Viral Video: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमाला गवासणी घालण्यात आल्याचं दिसून येत आहे. टीम इंडियाच्या शांत आणि संयमी स्वभावाच्या जयस्वाल (Yashaswi Jaiswal) याने कसोटी पदार्पणात मोठा विक्रम केला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात जयस्वालने खणखणीत शकत (Yashaswi Jaiswal Century) ठोकलं आणि टीम इंडियाला झकास सुरूवात करून दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जयस्वाल यशस्वीरित्या मैदानात पाय रोवून उभा आहे. यशस्वी पदार्पणात शतक करणारा 17 वा सलामीवीर भारतीय ठरलाय. अशातच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.
यशस्वी जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा अजिंक्य रहाणे याने गळाभेट घेतली आणि यशस्वीचं कौतुक केलं. त्यातबरोबर रोहित शर्माने आपल्या नव्या दमाच्या खेळाडूला शाब्बासकी दिली. टीमच्या सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागत केलं. सिराज, ईशान किशन यांनी देखील कौतूकाने यशस्वी जयस्वालची पाठ थोपटली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान ट्रेंड होत असल्याचं दिसतंय.
A special Debut
— BCCI (@BCCI) July 14, 2023
A special century
A special reception in the dressing room
A special mention by Yashasvi Jaiswal
A special pat on the back at the end of it all #TeamIndia | #WIvIND | @ybj_19 pic.twitter.com/yMzLYaJUvR
दरम्यान, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, 377 बॉलचा सामना करत यशस्वी जयस्वाल 162 धावा करत मैदानात खेळतोय. कॅप्टन रोहित शर्मा 103 धावा करत बाद झाला. त्यानंतर आता विराट कोहली जयस्वालला साथ देत मार्गदर्शन करताना दिसत आहे.
वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.