Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गौतम गंभीर आणि Oval क्युरेटर पुन्हा भिडले? कर्णधार शुभमन गिल बाजूला झाला अन्... Video Viral

IND vs ENG 5th Test: गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस पुन्हा एकदा आमनेसामने आले असून यावेळी गिल, कोटक आणि आगरकर देखील तिथे  होते पण सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.   

गौतम गंभीर आणि Oval क्युरेटर पुन्हा भिडले? कर्णधार शुभमन गिल बाजूला झाला अन्...  Video Viral

Gautam Gambhir vs Oval curator Lee Fortis: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात आज 31 जुलै पासून पाचवी आणि शेवटची टेस्ट रंगणार आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी  टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये द ओव्हलचा  पिच क्युरेटवर सोबत वादावादी झाली. याचाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या टेस्टपूर्वी एक नवीन वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर आणि केनिंग्टन ओव्हलचा क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात पुन्हा एकदा तणाव दिसून आला. या वेळेस कर्णधार शुभमन गिल, बॅटिंग कोच सितांशु कोटक आणि चीफ सिलेक्टर अजीत अगरकरही सोबत होते पण सर्वांनी फोर्टिसकडे दुर्लक्ष केलं. 

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, फोर्टिस गंभीरकडे संवाद साधण्यासाठी गेला, पण गंभीरने त्यांच्याकडे पाठ फिरवली. एवढंच नई तर  तो त्याला इग्नोर करून गिलशी बोलत राहिला. फोर्टिस काहीतरी बोलताना दिसला, पण गंभीर आणि त्यांची टीम त्यांच्याशी कोणताही संवाद न करता निघून गेली. एक क्षण असाही आला जिथे वाटलं की वाद उफाळेल, पण भारतीय संघांच्या खेळाडूंनी फोर्टिसपासून शांतपणे अंतर ठेवणंच पसंत केलं.

 

मागच्या वादाची पार्श्वभूमी काय? 

या आधी 29 जुलै रोजी भारतीय संघाच्या  ट्रेनिंग सत्रादरम्यान गंभीर आणि फोर्टिसमध्ये तुफान शाब्दिक झटापट झाली होती. फोर्टिसने भारतीय स्टाफला पिचपासून 2.5 मीटर दूर राहण्यास सांगितलं होतं आणि आइस बॉक्स पिचवर नेण्यास मनाई केली होती. याच मुद्द्यावरून वाद उफाळला होता.

जुना फोटो व्हायरल

सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल झाला आहे, जिथे फोर्टिस इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्कलमसोबत पिचवर उभा असल्याचे दिसून आला . त्यामुळे त्यांच्यावर नीट वागणूक न देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. भारतीय फॅन्स यामुळे चांगलेच नाराज आहेत.

 

 

कोटकने टीमचं समर्थन केलं

घटनेनंतर भारतीय बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आम्ही जॉगर्स घातले होते, स्पाइक्स नव्हे. पिचला कोणतंही नुकसान केलं नाही. पिच एखादी पुरातन वस्तू नाही" त्यांनी हेही स्पष्ट केलं की फोर्टिसने सपोर्ट स्टाफवर आवाज चढवून बोललं, आणि गौतम गंभीरला  त्यांची भाषा खटकली. 

 

भारतासमोर मालिकाविजयाचं आव्हान

भारत सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांची अनुपस्थिती भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. भारताकडे आकाश दीप आणि अर्शदीपसारखे पर्याय आहेत, जे 20 विकेट्स घेऊन सामना फिरवू शकतात.


गंभीर आणि क्युरेटर यांच्यातील तणाव आता पुन्हा चर्चेत आहे. भारताला मालिकेत टिकून राहण्यासाठी निर्णायक पाचव्या सामन्यात विजय हाच एकमेव पर्याय आहे. पण मैदानाबाहेरील ही वादळं, भारतीय खेळाडूंच्या मनोबलावर काय परिणाम करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More