Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'हा' भारतीय खेळाडू साउथ आफ्रिकेचा कर्णधार! झिबाब्वेविरुद्ध खेळणार सामना

New South Africa Captain: टेम्बा बावुमाच्या दुखापतीमुळे,एक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करेल, ज्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे एक नवीन चक्र सुरू होईल.   

'हा' भारतीय खेळाडू साउथ आफ्रिकेचा कर्णधार! झिबाब्वेविरुद्ध खेळणार सामना

Keshav Maharaj Will Lead South Africa: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. साउथ आफ्रिकेच्या क्रिकेट विश्वात एक मोठा बदल होत आहे.  टेंबा बावुमा याच्या दुखापतीमुळे साउथ आफ्रिकेच्या कसोटी संघाचं नेतृत्व आता भारतीय मूळ असलेल्या केशव महाराजकडे सोपवण्यात आलं आहे. झिबाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे साउथ आफ्रिकेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) नवीन फेऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. दुसरीकडे, टी-20 ट्राय सिरीजसाठी रासी वॅन डर डुसेनकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. ही मालिका जुलैमध्ये हरारेमध्ये खेळली जाणार असून त्यात साउथ आफ्रिका, जिंबाब्वे आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

टेंबा बावुमा बाहेर, महाराजला संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) विजेता साउथ आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 28 जूनपासून बुलावायोमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याच्या अनुपस्थितीत केशव महाराज कर्णधारपद सांभाळणार आहे.

रासी वॅन डर डुसेन टी-20 संघाचे कर्णधार

14 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या ट्राय सिरीज टी-20 मालिकेसाठी रासी वॅन डर डुसेन संघाचं नेतृत्व करणार आहे. या संघात काही नवोदित खेळाडूंना संधी मिळाली असून रुबिन हरमन आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, श्रीलंकेचा संघही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झिबाब्वे दौऱ्यावर दोन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

महाराजची भारतीय पार्श्वभूमी

झिबाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून निवड झालेले केशव महाराज हे भारतीय मूळाचा आहे. त्याच्या पूर्वजांनी 1874 मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केले होते. केशव यांचा जन्म डर्बनमध्ये झाला असून तो 35 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे, तो श्रीराम व हनुमान भक्त म्हणून ओळखले जातात. त्याने आतापर्यंत 58 कसोटी, 48 वनडे आणि 39 टी-20 सामने साउथ आफ्रिकेसाठी खेळले आहेत. नुकतेच त्याने लॉर्ड्सवर साउथ आफ्रिकेसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) चं विजेतेपद पटकावलं आहे.

दक्षिण आफ्रिका संघ 

केशव महाराज (कर्णधार), डेविड बेडिंघम, मैथ्यू ब्रीत्ज़के, डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोरजी, जुबैर हम्झा, क्वेना मफाका, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, लेसेगो सेनोकवाने, प्रेनेलन सुब्रायन, काइल वेरिन, कोडी युसुफ

जिंबाब्वे संघ

क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, तनाका चिवांगा, ट्रेवर ग्वांडु, ताकुदज्वानाशे काइतानो, क्लाईव्ह मदांडे, वेस्ली माधेवेरे, विंसेंट मासेकेसा, वेलिंग्टन मसकाद्झा, प्रिन्स मसवाउर, कुंडाई माटिगिमु, ब्लेसिंग मुजरबानी, न्यूमॅन न्यामुरी, तफदजवा त्सिगा, निकोलस वेल्च, सीन विलियम्स

Read More