Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खेळाडूंशी करार, मिळणार फक्त एवढे पैसे

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२०-२१ सालासाठी खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खेळाडूंशी करार, मिळणार फक्त एवढे पैसे

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२०-२१ सालासाठी खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची विभागणी ३ ग्रेडमध्ये केली आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उदयोन्मुख खेळाडूंची एक नवी ग्रेड तयार केली आहे. या ग्रेडमध्ये ३ युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

ए ग्रेडमध्ये फक्त ३ खेळाडू आहेत, तर बी ग्रेडमध्ये ९ आणि सी ग्रेडमध्ये ६ खेळाडू आहेत. या तिन्ही ग्रेडमधल्या खेळाडूंना किती पैसे मिळणार याची घोषणा करण्यात आलेली नसली, तरी भारताच्या खेळाडूंशी तुलना केली तर दोन्ही खेळाडूंमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. टीम इंडियाच्या सी ग्रेडमधल्या खेळाडूंना जेवढे पैसे मिळतात, तेवढे पैसेही पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळत नसल्याची माहिती आहे. 

बीसीसीआयने करारामध्ये ४ ग्रेड ठेवल्या आहेत. ए प्लस, बी आणि सी ग्रेड यामध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या ए प्लस ग्रेडमध्ये ३ खेळाडू आहेत. या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये मानधन मिळतं. ए ग्रेड वाल्यांना ५ कोटी, बी ग्रेड वाल्यांना ३ कोटी आणि सी ग्रेडच्या खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात. 

पाकिस्तानच्या ए ग्रेडमध्ये असणाऱ्या खेळाडूंना वर्षाला ११ लाख रुपये जे भारतात ५,१३,०२२ एवढे आहेत. बी ग्रेडच्या खेळाडूंना ७,५०,००० आणि सी ग्रेडच्या खेळाडूंना ५,५०,००० रुपये मिळतात. ही रक्कम टीम इंडियाच्या सी ग्रेडच्या खेळाडूंपेक्षाही कमी आहे. 

पाकिस्तानच्या ए ग्रेडच्या सगळ्या खेळाडूंना मिळणारी रक्कम १५,३९,०६६(भारतीय रक्कम), बी ग्रेडमध्ये सगळ्या खेळाडूंचे मिळून ३१,४८,०९२ (भारतीय रुपये) आणि सी ग्रेडमध्ये मिळून १५,३९,०६६ (भारतीय रुपये) होतात. या सगळ्यांची बेरीज केली तर एकूण रक्कम भारतीय रुपयांनुसार ६२,२६,२२४ रुपये एवढी होती. भारताच्या सी ग्रेडच्या एका खेळाडूलाही यापेक्षा जास्त म्हणजे १ कोटी रुपये वर्षाला मिळतात. 

Read More