Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताने FIDE Women’s Chess World Cup मध्ये रचला इतिहास! दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही गाठला अंतिम टप्पा

Koneru Humpy Qualify FIDE Chess World Cup Final: दिव्या देशमुखनंतर, कोनेरू हम्पीने बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने पुढील वर्षी होणाऱ्या उमेदवार स्पर्धेसाठी देखील कॉलिफाय झाली आहे.  

भारताने FIDE Women’s Chess World Cup मध्ये रचला इतिहास! दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही गाठला अंतिम टप्पा

Koneru Humpy vs Divya Deshmukh: भारताने एफआयडीई (FIDE) महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 मध्ये इतिहास घडला आहे. आधी नागपूरची लढवय्या दिव्या देशमुख फायनलमध्ये पोहोचली आणि आता अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने देखील अंतिम फेरीत प्रवेश करत भारताचा डंका पुन्हा एकदा वाजवला आहे. कोनेरू हम्पीने सेमीफायनल टायब्रेकरमध्ये चीनच्या टिंगजी लेईला हरवून भारताचा झेंडा उंचावला आहे. यामुळे या वर्षीचा महिला शतरंज वर्ल्ड कप अंतिम सामना भारत विरुद्ध भारत असणार आहे. 

सेमीफायनलमध्ये दमदार विजय!

23 जुलै रोजी पार पडलेल्या सेमीफायनलमध्ये कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिच्याशी कडवी झुंज दिली. दोन्ही क्लासिकल गेम्स अनिर्णीत राहिल्यामुळे सामना टायब्रेकरमध्ये गेला. मात्र, अनुभवाचा कस लावत कोनेरूने निर्णायक खेळ करत चीनी खेळाडूवर मात केली आणि फायनलचे तिकीट कंफर्म केलं.

हे ही वाचा: 140000000000 रुपये खर्च करून टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट खरेदी करत आहे मानवी विष्ठा, कारण....

 

कॅंडिडेट्स टूर्नामेंटमध्येही हम्पीचं नाव निश्चित!

या शानदार कामगिरीच्या जोरावर कोनेरू हम्पीने केवळ वर्ल्ड कप फायनलच नाही, तर 2026 च्या कॅंडिडेट्स टूर्नामेंटसाठी आपली जागा आधीच निश्चित केली आहे. म्हणजेच, महिला विश्वविजेतेपदासाठीच्या शर्यतीत ती अधिकृतपणे सामील झाली आहे.

हे ही वाचा: IND vs ENG: मँचेस्टरमध्ये शुभमन गिलसोबत अपमानास्पद प्रकार, इंग्लिश प्रेक्षकांनी केले 'हे' वाईट कृत्य

 

दिव्या देशमुखचा ऐतिहासिक पराक्रम!

दुसरीकडे, दिव्या देशमुखने चीनच्या तान झोंग्यी हिला पराभूत करून फायनलमध्ये पोहोचण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. FIDE महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान दिव्याने पटकावला आहे.

हे ही वाचा: 'टी'ब्रेकमध्ये क्रिकेटर्स खरंच चहा पितात? स्टार क्रिकेटरने केला खुलासा

 

या वेळेस विश्वविजेती भारताचीच होणार!

ही गोष्ट निश्चित झाली आहे की FIDE महिला शतरंज वर्ल्ड कप 2025 ची विजेती भारताचीच असणार आहे. कारण अंतिम सामना भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख यांच्यात होणार आहे. दोन पिढ्यांचा, अनुभव आणि उत्साहपूर्ण सामना संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर स्थिरावणारा ठरणार आहे.

Read More