Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शमीची भेदक गोलंदाजी, बांग्लादेशचा पहिला डाव १५० धावात गुंडाळला

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. 

शमीची भेदक गोलंदाजी, बांग्लादेशचा पहिला डाव १५० धावात गुंडाळला

इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला आहे. पहिल्याच दिवशी सामन्याच्या अंतीम टप्प्यात चेतेश्वर पुजाराने ४३ आणि मंयक अग्रवाल ३७ धावांवर नाबाद राहिला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बाहेर पडणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय फलंदाज होता.

भारत आणि बांगलादेशमध्ये पहिला कसोटी सामना गुरूवारी इंदोरमध्ये रंगला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशनं घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय मात्र अपयशी ठरला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाहुण्या संघाला अवघ्या ५८.३ षटकांत गुंडाळले.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशच्या डावाची सुरूवात अडखळत झाली. त्यांचे दोन्हा सलामीवीर प्रत्येकी सहा धावा करून तंबूत परतले. त्यानंतर हक ३७ धावांवर तंबूत परतला तर, मुशफिकूरला मोहम्मद शमीने ४३ धावांवर टिपले. अन्य फलंदाजही ठराविक अंतरानं बाद होत गेले.

शामीने भेदक गोलंदाजी जोरावर तीन गडी बाद केले. इशांत शर्मा, उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 

Read More