Chetan Sharma Sting Operation: झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये इंजेक्शनच्या मदतीने टीम इंडियाचे अनफिट खेळाडू देखील फिट होत आहेत, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा (BCCI Selector Chetan Sharma) यांनी केला आहे. जे खेळाडू 100 टक्के फिट नाहीत, ते देखील इंजेक्शन देऊन फिटनेस दर्शवतात, असा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला आहे.
अरे हे एवढे मोठे सुपरस्टार आहेत. त्यांच्याकडे डॉक्टरांची काय कमी आहे. असे हजारो डॉक्टर बसले आहेत. रात्री एक फोन केला तर डॉक्टर रात्री घरी येतो. आम्हाला या बाबतीत काहीच माहिती नव्हती. सामना झाल्यानंतर खेळाडू हॉटेलमध्ये जात होते. कोण काय करतात, हे पाहण्यासाठी त्यांच्यामागे आम्ही जात नाही. कोण नियम तोडतंय, त्याची माहिती आम्हाला मिळत नव्हती, असंही चेतन शर्मा म्हणाले आहेत.
ज्यावेळी बुमराह आला त्यावेळी तो फिट होता. त्यावेळी आम्ही ठरवलं की, वर्ल्ड कपच्या आधी आता फक्त दोन मॅच राहिल्या आहेत. माझं म्हणणं होतं की, आपण तिसरी मॅच बुमराहला खेळवू, मात्र, द्रविड आणि रोहित म्हणाले दुसरा खेळवू. त्यानंतर त्याला लवकर रेस्ट देऊन, ऑस्ट्रेलिया पाठवलं जाईल. बुमराहला दोन प्रॅक्टिस मॅच खेळण्याचं ठरवलं होतं. दुसऱ्या मॅचनंतर मला फोन आला की, त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटत होतं, असं चेतन शर्मा म्हणतात.
आणखी वाचा - IPL 2023: धोनीच्या स्वप्नाचा होणारा चुराडा? आयपीएलपूर्वी माहीचा हुकमी एक्का 'आऊट'
बुमराहला ऑस्ट्रेलियाला पाठवलं असतं अन् त्याला फिट राहता आलं नसतं तर आम्हाला पुन्हा नवी प्रोसेस करावी लागली असती. दुसऱ्या सामन्यानंतर स्कॅन करण्यात आलं. तेव्हा अशा काही गोष्टी समोर आल्या. ज्यामुळे तो कमीत कमी एका वर्षासाठी खेळू शकला नसता. त्याची फिटनेस त्या प्रकारची नव्हती. त्यानंतर आमची मिटिंग झाली.
Zee News पर बड़ा खुलासा LIVE: चेतन शर्मा ने किए कई अहम खुलासे
— Zee News (@ZeeNews) February 14, 2023
WATCH LIVE: https://t.co/HikUQEM14E #GameOver @preetiddahiya @DChaurasia2312 pic.twitter.com/1ALdlkuErp
बुमराहला बोलावलं गेलं होतं. त्यावेळी तो म्हणाला मी करेल, मात्र त्याच्या फिटनेसचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही त्याला सोडण्याचा निर्णय घेतला, असं चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगतात. आम्ही बुमराहला पाकिस्तानविरुद्ध खेळवलं असतं. मात्र, त्याला जर खेळवलं असतं आणि त्याला काही सामन्यामध्ये झालं असतं. तर आम्ही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नसतो, असंही चेतन शर्मा म्हणतात..