Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'जर BCCI भारतीय खेळाडूंना पाठवत नसेल....',इंजमाम उल-हकने सर्व देशांना केलं जाहीर आवाहन, 'IPL वर...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमान उल-हकने (Inzamam ul Haq) आयपीएलवर आंतरराष्ट्री स्तरावर बंदी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.   

'जर BCCI भारतीय खेळाडूंना पाठवत नसेल....',इंजमाम उल-हकने सर्व देशांना केलं जाहीर आवाहन, 'IPL वर...'

चॅम्पिअन्स ट्रॉफीवरुन सध्या वाद सुरु असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सकलेन मुश्ताकनंतर (Saqlain Mushtaq) आता माजी कर्णधार इंजमाम उल-हकने (Inzamam ul Haq) बीसीसीआयवर टीका केली आहे. त्याने इतर बोर्डांना आयपीएलवर बंदी घालण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. इंग्लंडचे दिग्गज खेळाडू नासीर हुसेन आणि माइक अथर्टन यांनी केलेल्या विधानानंतर बीसीआय टीकेच्या केंद्रस्थानी आहे. फक्त दुबईत खेळत असल्याने भारतीय संघाला इतर संघांच्या तुलनेत अतिरिक्त फायदा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

भारतीय सरकारने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी परवानगी दिली नाही. दोन्ही देशांमधील ताणलेले राजकीय संबंध आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारताने हिरवा कंदील दिला नाही. यामुळे आयसीसीला भारताचे सर्व सामने दुबईत खेळवावे लागत आहेत. 

या वादादरम्यान इंजमाम उल-हकने आयपीएलवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी पाठवत नाही, मात्र पदेशातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात याची आठवण त्याने करुन दिली आहे. 

"चॅम्पिअन्स ट्रॉफीचा मुद्दा बाजूला ठेवा. अनेक टॉप खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतात. मात्र भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये सहभागी होत नाहीत. इतर बोर्डांनी त्यांचे खेळाडू आयपीएलला पाठवणं बंद केलं पाहिजे. जर तुम्ही (बीसीआय) तुमचे खेळाडू इतर लीगसाठी रिलीज केले नाहीत, तर इतर बोर्डांनीही ठाम भूमिका घ्यावी," असं इंजमामने पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनेलला सांगितलं.

बीसीसीआय अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही भारतीय खेळाडूला करारानुसार परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही, जोपर्यंत तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत नाही, ज्यामध्ये आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांचा समावेश आहे. सहभागी खेळाडूंना यापुढे बीसीसीआयने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये परतण्याची परवानगी राहणार नाही.


दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याच्या तयारीसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये रवाना झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 

या सामन्यातील निकालानंतर दुबईमध्ये पहिल्या नॉकआउट सामन्यात ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेपैकी भारताशी कोण भिडणार याचा निर्णय होईल. जर भारताने न्यूझीलंडला हरवलं तर ते ऑस्ट्रेलियाशी आणि हरले तर दक्षिण आफ्रिकेशी सामना होईल. 

उपांत्य फेरीच्या अनिश्चिततेदरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भारताविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी दुबईला पोहोचले आहे. तथापि, बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी यापैकी एका संघाला 2000 किमीचा प्रवास करुन पाकिस्तानला परतावे लागेल. 

Read More