Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली

आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

पत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली

मुंबई : आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

चेन्नई आणि राजस्थान पुन्हा मैदानात

बंदीमुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स टीम्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर चेन्नई आणि राजस्थानची टीम पुन्हा या मोसमात पुनरागमन करत आहेत. दोन्ही टीम्स २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्या होत्या त्यानंतर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

हे पण पाहा: VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात

सर्वच टीम्स आयपीएलमध्ये विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत. यासोबतच क्रीडाप्रेमी, खेळाडूंचे नातेवाईक आपल्या प्रमोशनसाठी सज्ज झाले आहेत. याच प्रमाणे ३ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेहनेही आपल्या पतीचं प्रमोशन केलं.

 

@rohitsharma45 @gqindia

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

रितिकाने आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन एका मॅगझिनचा कव्हर फोटो शेअर केला आहे. या फोटोत रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' असं संबोधण्यात आलं आहे. रितिकाने हा फोटो शेअर करताच महेंद्रसिंग धोनीचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी रितिकाला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

क्रिकेट विश्वात सर्वांनाच माहिती आहे की, महेंद्रसिंग धोनीला 'कॅप्टन कूल' असं संबोधलं जातं. मात्र, रितिकाने रोहितला 'कॅप्टन कूल' म्हटल्याने धोनीचे चाहते प्रचंड नाराज झाले. यावर धोनीच्या चाहत्यांनी म्हटलं की, क्रिकेटमध्ये केवळ एकच 'कॅप्टन कूल' आहे आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी.

Read More