Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: एबी डिव्हिलियर्सने एका हाताने मारला सिक्स, बॉल थेट छपरावर!

आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रनने विजय झाला.

VIDEO: एबी डिव्हिलियर्सने एका हाताने मारला सिक्स, बॉल थेट छपरावर!

बंगळुरू : आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रनने विजय झाला. या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनिस हे बंगळुरूच्या विजयाचे शिल्पकार ठरले. एबी डिव्हिलियर्सने ४४ बॉलमध्ये नाबाद ८२ रनची तर मार्कस स्टॉयनिसने ३४ बॉलमध्ये नाबाद ४६ रनची खेळी केली. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी नाबाद १२१ रनची पार्टनरशीप झाली.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या विस्फोटक खेळीमध्ये ७ सिक्स आणि ३ फोर मारले. यातली एबीने एका हाताने मारलेली सिक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने एबीला कंबरेवर बॉल टाकला. या बॉलवर एबीने एका हाताने सिक्स मारली. एबीने मारलेला हा बॉल थेट चिन्नास्वामी स्टेडियमच्या छपरावर गेला. एबीने मारलेली ही सिक्स ९५ मीटर लांब गेली. एबी डिव्हिलियर्सचा हा शॉट बघून मोहम्मद शमीनेही डोक्याला हात लावला.

पंजाबविरुद्धच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये बंगळुरू शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर गेली आहे. तर राजस्थानची टीम आता शेवटच्या क्रमांकावर फेकली गेली आहे. 

Read More