जयपूर : राजस्थान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने पराभव झाला. राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर ही मॅच खेळण्यात आली होती. मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी मुंबईच्या खेळाडूंनी रेकॉर्डब्रेक केला आहे. सूर्यकुमार यादव आणि क्विटंन डी कॉक या जोडीने हा रेकॉर्डब्रेक केला आहे.
राजस्थानने टॉस जिंकत मुंबईला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मुंबईने पहिली विकेट स्वस्तात गमावली. यानंतर वनडाऊन आलेल्या सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९७ रनची पार्टनरशीप झाली. शतकी पार्टनरशीप अवघ्या ३ रनने हुकली. परंतु या ९७ रनची पार्टनरशीप करुन या जोडीने या मैदानावरील रेकॉर्ड मोडीत काढत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या १२ व्या पर्वातील आतापर्यंतची विक्रमी पार्टनरशीपचा मान मिळवला आहे.
.@QuinnyDeKock69 and @surya_14kumar added 97 valuable runs in just 68 balls for the second wicket!
— Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2019
LIVE updates: https://t.co/7Bnunj2WO3 #OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #RRvMI @QuinnyDeKock69 @surya_14kumar pic.twitter.com/cQwV8d9Jus
क्विंटन डी कॉक-सूर्यकुमार यादव या जोडीने अंबाती रायुडू- महेंद्रसिंह धोनीचा पार्टनरशीपचा रेकॉर्ड मोडला आहे. रायुडू-धोनी जोडीने याआधी ९५ रनची पार्टनरशीप केली होती.
आयपीएलच्या १२ व्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आतापर्यंत करण्यात आलेल्या काही निवडक पार्टनरशीप पाहूयात.
क्विंटन डी-कॉक – सूर्यकुमार यादव : ९७ रनची पार्टनरशीप
अंबाती रायुडू – महेंद्रसिंह धोनी : ९५ रनची पार्टनरशीप
ख्रिस लिन – सुनिल नरीन : ९१ रनची पार्टनरशीप
क्विंटन डी-कॉक – सूर्यकुमार यादव : ८४* रनची पार्टनरशीप
ख्रिस गेल – सरफराज खान : ८४ रनची पार्टनरशीप
राजस्थान विरुद्ध झालेल्या या पराभवामुळे मुंबईचा हा या पर्वातील चौथा पराभव ठरला आहे. मुंबई अंकतालिकेत १२ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा विजय झाल्याने त्यांचे ६ पॉईंट झाले आहेत. मुंबईने आयपीएलच्या या १२ व्या पर्वात राजस्थान विरुद्ध दोन मॅच खेळल्या आहेत. यापैकी दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला आहे.