Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2020: हैदराबादचा दिल्लीवर 15 रनने विजय

हैदराबादचा पहिला विजय

IPL 2020: हैदराबादचा दिल्लीवर 15 रनने विजय

अबुधाबी : आयपीएल 2020 च्या 11 व्या सामन्यात हैदराबादने दिल्लीला 15 धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएल 13 मध्ये आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. सनरायझर्स हैदराबादकडून रशिद खान आणि भुवनेश्वर कुमारने महत्त्वाची कामगिरी बजावली.

आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर रशीदने 3 आणि भुवीने दिल्लीच्या 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर सनरायझर्स हैदराबादने दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 163 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल संघाचा संघ 20 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट गमवून फक्त 147 धावा करु शकला.

हैदराबादचा पहिला विजय

या आयपीएलमध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने पहिला विजय मिळवला आहे. हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने या सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली,. त्याने मार्कस स्टोइनिसला 9 धावांवर आऊट केले. ऋषभ पंतला 28 रनवर रशीद खानने आऊट केलं. 

Read More