Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये KKR चा धमाका; विजेतेपद पटकावलं

जलद गोलंदाज लोकी फर्ग्यूसन ठरला 'गेम चेंजर'

IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये KKR चा धमाका; विजेतेपद पटकावलं

मुंबई : आयपीएलच्या १३ व्या सिझनमधील ३५ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स KKR ने आपल्या नावे करून घेतला. रविवारी अबुधाबीत कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये मात दिली. हैद्राबादने १६४ धावाचं लक्ष्य गाठताना २० ओव्हरमध्ये ६ गडी गमावून १६३ धावा केल्या आणि सामना टाय झाला. 

सुपर ओव्हरमध्ये कोलकाताला जिंकण्यासाठी फक्त तीन धावांच टार्गे मिळालं. जे तीन रन कॅप्टन इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक या जोडीने मिळवले. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा जलद गोलंदाज लोकी फर्ग्यूसन 'गेम चेंजर' ठरला. या सिझनमध्ये पहिला सामना खेळणारा फर्ग्यूसनने सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादला फक्त दोन धावा दिल्या आणि डेविड वॉर्नर, अब्दुल समदला बोल्ड केलं. ज्यानंतर कोलकाताने दोन चेंडू असताना तीन रन केले आणि हैद्राबादकडून विजय हिसकावून घेतला. 

कोलकाता नाईट रायडर्सचा हा पाचवा विजय आहे. ९ सामन्यात १० अंक कमावून चौथ्या क्रमांकावर आहे कोलकाता. कोलकाताने या अगोदर देखील हैद्राबादला हरवलं आहे. तर सनरायझर्स हैद्राबादचा हा सहावा पराजय आहे. ९ सामन्यात ६ अंक मिळवून पाचव्या क्रमांकावर आहे.

Read More