Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2020: मंयक अग्रवालकडे ऑरेंज कॅप, तर शमीकडे पर्पल कॅप

आयपीएलमध्ये आतापर्यंत मयंक अग्रवालचे सर्वाधिक रन

IPL 2020: मंयक अग्रवालकडे ऑरेंज कॅप, तर शमीकडे पर्पल कॅप

अबुधाबी : मयंक अग्रवालने आपल्याच संघाचा कर्णधार केएल राहुलला मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवली आहे. तर पर्पल कॅप मोहम्मद शमीकडे कायम आहे. मयंक आणि शमीचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून 48 धावांनी पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात मयंकने 25 धावा केल्या आणि यासह मयंकचे चार सामन्यांमध्ये 246 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो आता पहिल्या स्थानावर आहे. मुंबई विरुद्ध राहुलला फक्त 17 धावा करता आल्या. त्याच्या एकूण 239 धावा झाल्या आहेत.

गोलंदाजीत शमीने 4 सामन्यात 8 विकेट घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटलच्या कॅगिसो रबाडाचा क्रमांक लागतो. रबाडाने 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. तिसर्‍या क्रमांकावर राहुल चहर असून त्याने 4 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप ही सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला दिली जाते आणि पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते.

Read More