नवी दिल्ली : आयपीएल २०२० दरम्यान सुर्यकुमार यादवने आरसीबीविरोधात ४३ बॉल्समध्ये ७९ रन्स बनवले आणि मुंबई इंडीयन्सला विजय मिळवून दिला. मॅचचा विनिंग शॉटदेखील सुर्यकुमारने लगावला. त्यानंतर विराट कोहलीकडे पाहून केलेल्या इशाऱ्याने त्याने सर्व फॅन्सची मनं जिंकली आहेत.
This Game was an Answer to all those selectors He is on a mission My heart goes out to surya what a player #SuryakumarYadav #Virat #kohli #surya #mi #RCB #MIvsRCB #IPL #BCCI #Australia #selectdugout @IPL @mipaltan @RCBTweets @surya_14kumar pic.twitter.com/gwCxce5Y5A
— Pran Parab (@ImPran25) October 29, 2020
आरसीबी आणि मुंबई इंडीयन्समधील सामना ऐन रंगात आला होता. सुर्यकुमारला बॅटींगची लय सापडली होती आणि तो सुसाट खेळत होता. पण विराट कोहलीने सुर्यकुमार विरोधात नकारात्मक रणनितीचा वापर केला. विराट सारखा सुर्यकुमार समोर जायचा आणि त्याच्याकडे बघत राहायचा. पण सुर्यकुमारने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि आरसीबीच्या कॅप्टनकडे दुर्लक्ष केले.
Love u Surya.
— HITMAN (@ROxSSR45) October 28, 2020
That's the way u deal#MIvsRCB pic.twitter.com/8q1mMW0WSF
आपल्यावर झालेल्या निगेटीव्ह अटॅकचे उत्तर सुर्यकुमारने पॉझिटीव्ह पद्धतीने दिले. मॅचमध्ये जिंकल्यानंतर सुर्याने कोहलीकडे पाहीले आणि सर्वकाही ठीक आहे का ? असे विचारले. सुर्याची ही स्टाईल फॅन्सना खूप आवडली.
सुर्यकुमारने आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगला खेळ केलाय. पण तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही. आरसीबीविरोधात त्याला 'मॅन ऑफ द मॅच' देऊन गौरविण्यात आले.