Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPLवरही कोरोनाचं महासंकट; राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून मदतीचा हात

IPL2021 वर कोरोनाचं महासंकट असताना सर्व ती काळजी घेऊन IPL सुरू आहे. क्रिकेट विश्वातूनही पीएम केअर फंडला मदत केली जात आहे.

IPLवरही कोरोनाचं महासंकट; राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून मदतीचा हात

मुंबई: जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. भारतातही हे संकट अधिक वाढत आहे. त्याचमध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजनची कमतरा अशा अनेक समस्या देखील समोर असताना आता बॉलिवूड, क्रिकेट विश्व, उद्योग समूहातील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. IPLवर देखील कोरोनाचं संकट आहे. काही खेळाडूंनी कडक बायोबबल तर काहींनी कोरोनाचा भीतीनं भारतातून गाशा गुंडळला. 

कोरोनावर मात करण्यासाठी आता क्रिकेटपटूंप्रमाणेच IPLमधील फ्रांचायझी पुढे आल्या आहेत. राजस्थान रॉयल्स संघातील मॅनेजर, खेळाडू आणि फ्रांचायझीने मिळून 7.5 कोटी रुपयांची मदत केली आहे. राजस्थान संघाने याची माहिती ट्वीट करून दिली. 

विदेशी खेळाडूंनी देखील पीएम केअर फंडमध्ये मदतीसाठी हात पुढे केला आहे. कोरोनाच्या काळात गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी आता खेळाडू देखील पुढे येत आहेत. 

IPL 2021 : आयपीएलवर आता कोरोनाचं सावट, खेळाडूं पाठोपाठ अंपायर देखीत सोडत आहेत टूर्नामेंट

पॅट कमिन्सनने 38 लाख तर ब्रेट लीने 40 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघानेही कोरोनाच्या महासंकटात दीड कोटी रुपये मदत म्हणून दिले आहेत. ऑक्सिजन आणि कोव्हिट कीट खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रॅचायझीने खारीचा वाटा उचलला आहे. 

Read More