Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 CSK vs DC: शिखर पृथ्वी शॉला म्हणतोय... बेटा वाघ आहेस तू! , व्हिडीओ

पृथ्वी आणि धवनच्या जोडीनं CSK संघाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं आणि चोप चोप चपून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. 

IPL 2021 CSK vs DC: शिखर पृथ्वी शॉला म्हणतोय... बेटा वाघ आहेस तू! , व्हिडीओ

मुंबई: दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 गडी राखून चेन्नई सुपरकिंग्स संघावर विजय मिळवला आहे. शिष्य ऋषभ पंतने गुरू धोनीला टफ फाइट देत विजय मिळवला आहे. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवननं कमाल खेळी केली. 

शिखर धवननं 85 धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉनं 72 धावांची खेळी आहे. ऋषभ पंतने 15 धावा केल्या. पृथ्वी आणि धवनच्या जोडीनं CSK संघाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं आणि चोप चोप चपून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर दोघांनीही आनंद साजरा केला आहे. 

शिखर धवननं पृथ्वी शॉला या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तू तो शेर है म्हटलं आहे. पण खाली तू उचलायला देखील जड आहेस असं म्हणताना दिसत आहे. दोघांनी आनंद साजरा करत केलेली धमाल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पृथ्वी शॉनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केली होती. त्याचा दमदार फॉर्म IPLच्या दिल्लीच्या पहिल्या सामन्यातही पाहायला मिळाला. त्यापुढच्या सामन्यात तो कायम पाहायला मिळणार असा विश्वास चाहत्यांना आहे. 

Read More