Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 DC vs PBKS: दिल्ली संघातील 'हा' खेळाडू श्रेयस अय्यरला करतोय मिस, व्हिडीओ

दिल्लीच्या कॅप्टनला मिस करतोय हा फास्ट बॉलर, पाहा काय म्हणाला

IPL 2021 DC vs PBKS: दिल्ली संघातील 'हा' खेळाडू श्रेयस अय्यरला करतोय मिस, व्हिडीओ

मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामात आजपासून दोन सामने होणार आहेत. आज बंगळुरू विरुद्ध कोलकाता चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघ आज संध्याकाळी 7.30 वाजता आमने सामने भिडणार आहेत. 

या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूनं श्रेयस अय्यरला खूप मिस करत असल्याचं मुलाखती दरम्यान सांगितलं. श्रेयस अय्यर आज संघासोबत नसल्यानं त्याची उणीव भासत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. त्याचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाज एर्निच नॉर्टिए श्रेयस अय्यरला खूप मिस करत आहे. त्याने व्हिडीओमधून आपली भावना शेअर केली आहे. एर्निच नॉर्टिएचा कोव्हिड टेस्टचा रिपोर्ट चुकीचा आल्यानं त्याला 2 दिवस जास्त क्वारंटाइन राहावं लागलं होतं. त्यामुळे राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला खेळता आलं नाही. मात्र आता तो पूर्णपणे फिट असून पंजाब विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

आधीचा सामना जरी गमावला असला तरी आम्ही या सामन्यात नक्की विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. या सोबतच श्रेयसला मिस करत असल्याचंही त्याने सांगितलं. श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो संपूर्ण IPL बाहेर असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन 
ऋभष पंत (कर्णधार) शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेटमेयर, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा,एर्निच नॉर्टिए, अवेश खान

Read More