Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021: राजस्थानचा जादूगर! डेव्हिडचा डगआऊटमध्ये अतरंगी खेळ

कधी मोबाईलविना सेल्फी तर कधी बिहू डान्स आता तर काय चक्क डगआऊटमध्ये अतरंगी खेळ राजस्थान टीमची आयपीएलमध्ये धमाल

IPL 2021: राजस्थानचा जादूगर! डेव्हिडचा डगआऊटमध्ये अतरंगी खेळ

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर राजस्थान संघाचा शेवटचा सामना नुकताच कोलकाता सोबत पार पडला. या सामन्यात राजस्थान संघाने 6 विकेट्सनं कोलकाता संघावर मात करत 14 व्या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. 

नुकताच राजस्थान संघातील रियान परागचा विना मोबाईल सेल्फी फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असताना आता राजस्थानच्या जादूगाराचा व्हिडीओ समोर आला आहे. कोण आहे हा जादूगर आणि का होते चर्चा जाणून घेऊया. 

IPLसामन्या दरम्यान डेव्हिड मिलर राजस्थान संघाचा जादूगार बनल्याचं पाहायला मिळालं. डगआऊटमध्ये बसलेल्या आपल्या टीममधील खेळाडूंना डेव्हिड अतरंगी खेळ करून दाखवत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. डेव्हिडची ही जादू सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सचिनकडून शार्दुला कानमंत्र - सचिननं असं काय सांगितलं ज्यामुळे शार्दुलचं आयुष्य बदललं

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, डेव्हिड मिलर हातात 3 क्रिकेट खेळण्याचे बॉल घेऊन त्यांच्यासोबत खेळताना दिसत आहेत. तिन्ही बॉल फिरवत असताना त्यातला एक बॉल डेव्हिड गायब करतो. त्याच्या हातात शेवटी दोन बॉल बघून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि सर्वजण त्याच्याकडे पाहात राहतात.

'मोग्याम्बो कुशीया', गेलनं म्हटला अमरीश पुरींचा प्रसिद्ध डायलॉग, व्हिडीओ

डेव्हिडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. डेव्हिडने कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद 24 धावा केल्या आहेत. राजस्थान संघाने कोलकाता संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं आहे. 

Read More