Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 : MI vs RCB पहिल्या सामन्याआधी कोहलीचा फॅन्ससाठी खास मॅसेज

विराट कोहली पहिल्या सामन्यासाठी सज्ज. ट्विट करत दिली माहिती.

IPL 2021 : MI vs RCB पहिल्या सामन्याआधी कोहलीचा फॅन्ससाठी खास मॅसेज

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) चा पहिला सामना सुरु होण्यासाठी काही तास उरले आहेत. विजेतेपद जिंकण्यासाठी सर्व संघ जोरदार तयारी करीत आहेत. आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीही 14 व्या मोसमात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.

आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे. 'फोक्सड आणि रेडी टू गो' असं म्हणते त्याने ट्विटरवर 4 फोटो शेअर केले आहेत.

आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे. या दिवशी विराट कोहलीची आरसीबी टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. हा सलामीचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळला जाईल.

विराट कोहलीची टीम आरसीबीसाठी पहिला सामना सोपा नसणारे. 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स देखील आयपीएल 2021 ची सुरुवात विजयाने करण्यासाठी उत्सूक आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहावं लागेल.

Read More