Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021: 'या' खेळाडूला मुंबई इंडियन्स संघ आज Miss करणार

 मुंबई इंडियन्स संघ आज एका खेळाडूला मिस करणार आहे. खरं तर हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. 

IPL 2021: 'या' खेळाडूला मुंबई इंडियन्स संघ आज Miss करणार

मुंबई: मुंबई इंडियन्न विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज सामना होत आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. आजपासून IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली असून 30 मे पर्यंत मैदानात IPLची धूम असणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्स संघ आज एका खेळाडूला मिस करणार आहे. खरं तर हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र आजचा पहिला सामना तो खेळू शकणार नसल्यानं काहीशी निराशा देखील आहे.

रोहित शर्माच्या संघातील विकेटकीपर क्विंटन डिकॉक पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. काही दिवसांपूर्वी त्याने वादग्रस्त पद्धतीनं आऊट केल्यानं म्हणजेच फेक फिल्डिंगवरून वाद झाला होता. या वादानंतर त्याच्यावर ICCने दंडही लावला होता. सध्या क्विंटन डिकॉक क्वारंटाइन असल्यानं पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. नुकताच तो दक्षिण आफ्रिकेतून आल्यानं त्याला BCCIच्या नियमानुसार क्वारंटाइनचे नियम पाळावे लागणार आहेत.

पहिल्या सामन्यात डिकॉक नसल्यानं संघातील खेळाडू त्याला मिस करणार आहेत. डिकॉक चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकाहून आला आहे. त्याला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. सध्या ईशान किशन रोहित शर्माची साथ देणार असून विकेटकीपर म्हणूनही तोच राहिल असं सांगितलं जात आहे. मुंबई संघाची मधली फळी जास्त मजबूत आहे. फलंदाजीच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड सारखे दमदार फलंदाज आहेत. गोलंदाजीतही संघात ट्रेंट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह आहे. 

Read More