Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 : कोहलीचं टेन्शन आणखी वाढलं; कोरोनाचा आणखी एका क्रिकेटरला विळखा

सामना सुरू होण्याअगोदरच संकटांना सामोरं जाणार कोहली 

IPL 2021 : कोहलीचं टेन्शन आणखी वाढलं; कोरोनाचा आणखी एका क्रिकेटरला विळखा

मुंबई : विराट कोहलीच्या टेन्शनमध्ये आणखी वाढ झाली आहे. ९ एप्रिल रोजी विराट कोहली कॅप्टन असलेला संघ आरसीबी आताचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल 2021 चा पहिला सामना खेळणार आहेत. मात्र या सामन्या अगोदर आरसीबीकरता अतिशय धक्कादायक बातमी आहे. आरसीबी संघाचा आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. 

आयपीएलच्या सुरूवातीच्या अगोदरच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा झटका बसला. आरसबीचा खेळाडू डॅनियल सॅम्स कोरोना संक्रंमणाचा शिकार झाला आहे. आरसीबीचा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलनंतर डॅनियल सॅम हा दुसरा खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर आता तो आयसोलेशनमध्ये आहे. 

आरसीबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 'डॅनियल सॅम्स चेन्नईत 3 एप्रिलपासून पोहोचला आहे. तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्याचा दुसरा रिपोर्ट 7 एप्रिल रोजी आला. ज्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली आहे.'

आता विराट कोहलीच्या टीमध्ये कोण आहे 

विराट कोहली (कॅप्टनन), एबी डीविलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, शाहबाज अहमद, वॉशिंगटन सुंदर, जोश फिलिप, पवन देशपांडे, एडम जंपा, ग्लेन मैक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जैमीसन, डेनियल क्रिश्चियन, केएस भारत, सुयश प्रभुदेसाई

Read More