Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 DC vs RCB: कोहलीसेना युवा पंतच्या टीमवर भारी पडणार?

दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद संघाला टफ फाईट देत सुपरओव्हरपर्यंत सामना खेळला होता. सुपरओव्हर जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

IPL 2021 DC vs RCB: कोहलीसेना युवा पंतच्या टीमवर भारी पडणार?

अहमदाबाद: चेन्नई सुपरकिंग्स संघासोबत पराभवातून सावर पुन्हा एकदा टफ फाईट देण्यासाठी कोहलीसेना सज्ज झाली आहे. दिल्लीचा युवा कर्णधार ऋषभ पंतची स्ट्रॅटजी आज यशस्वी ठरणार की विराटसेनेचे खेळाडू आपल्या दमदार खेळीनं मागे टाकणार हे आज पाहायला मिळणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यात केवळ चेन्नई विरुद्ध सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्याआधी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आजचा सामना जिंकण्यासाठी कोहली काय नवा प्लॅन करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद संघाला टफ फाईट देत सुपरओव्हरपर्यंत सामना खेळला होता. सुपरओव्हर जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टिव स्मिथ, ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिच नॉर्टजे आणि अमित मिश्रा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स (विकेटकीपर), डेनियल क्रिश्चियन, काइल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, शहबाद अहमद.

Read More