Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 RCB vs RR: बुमराह ते भज्जी...राजस्थान टीमच्या बॉलरनं केली हुबेहुब नक्कल

राजस्थान रॉयल्स आज हल्लाबोल करण्यात यशस्वी होणार की विराटचा संघ राजस्थानवर भारी पडणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IPL 2021 RCB vs RR: बुमराह ते भज्जी...राजस्थान टीमच्या बॉलरनं केली हुबेहुब नक्कल

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना आज रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत. बंगळुरू संघ सलग तीन सामने जिंकलं आहे. तर दुसरीकडे राजस्थान संघाला दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

राजस्थान रॉयल्स संघातील बॉरलनं मुंबई संघातील जसप्रीत बुमराह, दिल्ली कॅपिटल्स संघातील आर अश्विन आणि कोलकाता संघातील हरभजन सिंह अशा तीन वेगवेगळ्या गोलंदाजांची बॉलिंग स्टाइल कशी आहे याबाबत सांगताना त्यांची हुबेहुब नक्कल केली आहे. त्याचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्स संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राजस्थान संघातील श्रेयस गोपाळनं या तिघांची नक्कल केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भज्जी, बुमराह आणि आर अश्विनच्या बॉलिंग स्टाइलची त्याने हुबेहुब नक्कल केल्याचं यामध्ये दिसत आहे. 

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान संघाला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध 45 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. 

राजस्थान रॉयल्स संघ दिल्ली विरुद्धचा सामना 3 विकेट्सने जिंकला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आज पराभूत करण्यात आज यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read More