Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2021 SRH vs RCB: कोरोनावर मात करून हा खेळाडू पुन्हा उतरणार मैदानात

कोणाचा पत्ता कापला जाणार आणि SRH vs RCB संघात कोण मिळवणार विजय वाचा सविस्तर.

IPL 2021 SRH vs RCB: कोरोनावर मात करून हा खेळाडू पुन्हा उतरणार मैदानात

मुंबई: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना आज होत आहे. RCBच्या कर्णधाराला साथ देण्यासाठी कोरोनावर मात करून स्टार खेळाडू पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

22 मार्चला देवदत्त पडिक्कलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर कोरोनावर मात केल्यानंतर पहिला सामना तो खेळला नव्हता. मात्र आज हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो कमबॅक करणार असल्याचा कयास आहे. 

चेपॉक स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता RCB विरुद्ध SRH सामना रंगणार आहे. देवदत्त पडिक्कल आल्यानं RCB संघाला त्यांचा ओपनर पुन्हा मिळाला आहे. त्याच्या येण्यानं RCB संघाला अधिक फायदा होणार आहे. तो मैदानात खेळण्यासाठी उतरणार असल्यानं आता कोहली कोणाचा पत्ता कापणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेवन

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पटिदार, ग्लॅन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, वॉशिंगटन सुंदर, डॅनियल क्रिस्टियन, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल

हैदराबाद संघाचे प्लेइंग इलेवन

डेविड वॉर्नर (कर्णधार), ऋद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरेस्टो, जेसन होल्डर/ मोहम्मद नबी, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम/संदीप शर्मा, टी. नटराजन

Read More