Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 लिलावामध्ये 'हा' खेळाडू होणार पक्का मालामाल, आर. आश्विनने केली भविष्यवाणी!

आर. आश्विनने एका परदेशी खेळाडूचं नाव घेत त्याला या लिलावामध्ये मोठी बोली लागणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

IPL 2022 लिलावामध्ये 'हा' खेळाडू होणार पक्का मालामाल, आर. आश्विनने केली भविष्यवाणी!

Sport News :  क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या IPL चा मिनी-लिलाव 23 डिसेंबरला होणार आहे. यंदाच्या लिलावामध्ये परदेशी खेळाडू आहेत ज्यांच्यावर फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा लावतील. या खेळाडूंनी तशा दर्जाची कामगिरी केली आहे. यामध्ये यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचे विजेत्या संघातील बेन स्टोक्स आणि सॅम करन यांचा समावेश आहे. अशातच भारताचा ऑफस्पीनर आर. आश्विनने एका परदेशी खेळाडूचं नाव घेत त्याला या लिलावामध्ये मोठी बोली लागणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. 

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला यावेळी लिलावात सर्वात जास्त किंमत मिळणार असल्याचं आश्विनने म्हटलं आहे. त्यासोबतच स्टोक्सला लखनौ सुपर जायंट्स संघ मोठी बोली लावू शकतो असंही म्हणला आहे. याबाबत आश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.   वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरनलाही मोठी बोली लागेल असं म्हटलं आहे. 

या लिलावामध्ये लखनौ सुपर जायंट्सकडे लिलावासाठी एकूण 23.35 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे 4 परदेशी खेळाडूंना घेण्यासाठी स्लॉट मोकळे आहेत. त्यामुळे आश्विनने अशी भविष्यवाणी केली आहे.  

 दरम्यान, बेन स्टोक्सची आयपीएलमधील कामगिरी पाहिली तरी त्याने 43 सामन्यामध्ये 920 धावा केल्या आहेत. 25.56 ची  सरासरी आणि 134.50 स्ट्राईक आहे. त्यासोबतच त्याने 28 विकेट्सही घेतल्या आहेत.

Read More