Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 आधी कोलकाताच्या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंडनं काढली 'विकेट'

IPL सुरू होण्याआधी कोलकाताच्या क्रिकेटपटूची 'विकेट', फोटो शेअर करत म्हणाला....

IPL 2022 आधी कोलकाताच्या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंडनं काढली 'विकेट'

मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. या सामन्यापूर्वी एका फोटोमुळे कोलकाताचा खेळाडू चर्चेत आला आहे. कोलकाताच्या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंडनं विकेट काढली आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या चर्चा होत आहे. 

कोलकाता संघाचा स्टार खेळाडू टिम साउथीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यामध्ये तो आणि त्याची गर्लफ्रेंड आहे. त्याने कॅप्शनमध्ये कायम सोबत असं म्हणत हार्ट शेअर केला आहे. 

ब्राया साउथीसोबत टिम साउथीने लग्न केलं आहे. या दोघांचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला. ख्रिश्चन पद्धतीनं या दोघांचा लग्न सोहळा पार पडला. चाहत्यांनी त्याला नवा आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 

टिम साउथी कोलकाता संघातून खेळताना दिसणार आहे. मात्र तो पहिल्या सामन्यात असेल की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आयपीएलच्या करिअरमध्ये त्याने 47 सामने खेळून 31 विकेट्स घेतल्या आहेत. यंदा कोलकाता फ्रान्चायजी आणि श्रेयस अय्यर किती सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी देतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tim Southee (@tim_southee)

Read More