Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022 | दिल्लीचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय

दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (KolKata Knight Riders) 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

IPL 2022 | दिल्लीचा कोलकातावर 4 विकेट्सने विजय

मुंबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (KolKata Knight Riders) 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने विजयासाठी दिलेले 147 धावांचे आव्हान दिल्लीने 6 विकेट्स गमावून 6 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीचा या मोसमातील हा चौथा विजय ठरला. (ipl 2022 dc vs kkr delhi capitals win by 4 wickets against kkr at wankhede stadium in mumbai) 

दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. त्यानंतर रॉवमेन पॉवेलने 16 बॉलमध्ये नाबाद 33 रन्सची झंझावाती खेळी केली.  अक्षर पटेलने 24 धावा जोडल्या. तर ललित यादवने विजयात 22 धावांचं योगदान दिलं. 

केकेआरकडून उमेश यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेन आणि हर्षित राणा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिशेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, रोवमॅन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन : एरॉन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, वेंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साउथी आणि हर्षित राणा.

Read More